फार फार पसारा झालेला आज म्हटलेसाराच आवरून ठेवूया जरा
in Kavita
पसारा

मनातला प्रत्येक कोपरा
आठवणींनी भरलेला
त्यातून नकोसे स्मृतीकण
विलग करते आज जरा
जुनी- तुटलेली खेळणी
अर्धवटलेल्या कविता
त्यांत गुंतलेल्या तारा
कुठेच कशाचा थांग लागेना
साराच हा अस्ताव्यस्त पसारा
कितीदा तरी म्हटले मी
जोडून नव्याने घडवूया पुन्हा
चांगल्या मनाने प्रयत्न केला
पण हाती आला नुसता चुरा
जणू केरसुणीही म्हणावी
कालचा पसाराच होता बरा
हवासा असो वा नकोसा
बरोबर असो वा चुकीचा
आपणच जोपासून ठेवतो
भावनेत भरात वाहत जाऊन
आयुष्यातला असा काही कचरा
फेकून द्यावा वेळीच सांभाळून
हाच तर मनाचा खरा निचरा
फार फार झालेला पसारा
आज म्हटले
साराच आवरून ठेवूया जरा
येऊ द्यावा मनातल्या घरात
समाधानाचा मोकळा वारा,
मोकळा श्वास,
आणि सौख्याचा झरा
– रुपाली ठोंबरे

GIPHY App Key not set. Please check settings