आम्ही २१ सप्टेंबर १९८४ या दिवशी थंडीत कुडकुडत पण छातीत धडधडत सकाळी सात वाजता पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील ‘रुपाली’ अपार्टमेंट मधील एक नंबरच्या फ्लॅट समोर उभे होतो. बेल वाजवली. दरवाजा उघडला तो डॉ. जब्बार पटेल यांनी. तीन खोल्यांचा तो फ्लॅट, आत हॉलमध्ये एका सोफ्यावर जाड काड्यांचा चष्मा आणि शेवाळी-हिरव्या रंगाचा स्वेटर घालून ‘पुल’ अर्थात ‘भाई’ बसले होते, समोर बालभारती संस्थेचे काही अधिकारी बसले
in Literature
‘पुल’कित स्पर्श (संदीप गजानन श्रोत्री)



GIPHY App Key not set. Please check settings