एका अशा स्टेशनवर ही एकांकिका २०२२ मधे सादर केली होती. त्याचेच जेंव्हा २०२३ मधे सादरीकरण केले तेंव्हा त्या एकांकिकेचा सार लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून एक कविता लिहिली होती. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय
कुणासाठी काय तर कुणासाठी काय
कुणी सांगतो आपली व्यथा,
तिची मात्र निराळीच कथा
कुणी धावून केली शर्थ
तर कुणी धावला व्यर्थ
खरच स्वातंत्र्य म्हणजे काय
आहे का त्याला एकच अर्थ
मग कसे समजायचे
मी बंदिस्त की मुक्त
कुठे व्हायचे व्यक्त
की घुसमटायचे फक्त
हवय असे एक स्टेशन,
जिथे बोलू या शांत
किती पळायचं वर्तुळात
कुठे बसू या निवांत
एका अशा स्टेशनवरती
पाहू या एक स्वप्न स्वतःसाठी
घेऊ या एक श्वास स्वतःसाठी
ढाळू या एक अश्रू स्वतःसाठी
जगू या एक क्षण स्वतःसाठी
एक क्षण स्वतःसाठी,
एक क्षण स्वतःसाठी
आता मे महिन्यात याच एकांकिकेचे हिंदीत सादरीकरण केले त्यावेळी वैशाली केळकर, संदीप केळकर आणि मी मिळून कवितेच हिंदीत भाषांतर केले ते असे
मै हू स्वतंत्र क्या हैं इसका अर्थ
किसीके लिये कुछ तो किसी के लिये कुछ
कोई गायें अपना गान
तो कोई बजायें अपनी तान
कोई सुनायें बात अपने दुःख की
मगर उसकी कहानी तो कुछ ओर ही
किसी ने लगाई दौड जी तोड
तो कोई बस रह गया इसी ओर
मै हू स्वतंत्र, है क्या इसका एकही अर्थ
फिर मै कैसे समझूं
मै बंधन मे या मुक्त
कैसे सहूं ये घुटन
कैसे होऊं मै अभिव्यक्त
बहुत लगायें चक्कर बेकार
अब बैठे कही शांतमन
चाहियें ऐसा कोई स्टेशन
जहां ना हो कोई उलझन
चलो देखे एक ख्वाब अपने लियें
लेते है एक श्वास अपने लिये
बहाते है अपने लिये एक आसू
जीते हैं एक पल अपने लिये
जीते हैं एक पल अपने लिये
एक पल अपने लियें
एक पल अपने लियें


GIPHY App Key not set. Please check settings