.( व्हाट्सअँप समूह – वाडी दत्ताची राजधानी सुखाची वरून साभार )
in Astrology
नरसोबावाडी – अनुभव

आयुष्यात वाडीत जे काही पहिल्यांदा अनुभवायला मिळाल. जे काही वाटल ते शब्दात मांडण कधीच जमणार नाही….. सर्व दत्त महाराजांची कृपा…
हे वाचून कदाचित अगदीच सामान्य प्रश्न काहींना पडला ही असेल ..तो हाच की….मग असा अनुभव सगळ्यांनाच का येत नाही? एकाच पादुकेसमोर नतमस्तक होऊन उभं राहणारे शेकडो भक्त असतात, पण प्रत्येकाला सारखंच काही जाणवत नाही. अस का?…आणि प्रश्न हे स्वाभाविक असतात…कधी ते सहज येतात कधी… प्रसंगानुसार.. बरोबर ना??..
आता याच…कारण म्हणजे अनुभव जागेवर अवलंबून नसतो. तो आपल्या मनाच्या तयारीवर अवलंबून असतो. ज्या मनात अपेक्षांच ओझ कमी असत, जे मन फक्त उपस्थित राहायला शिकलेल असत, तिथेच चैतन्य उतरायला जागा मिळते. गच्च भरलेल्या भांड्यात नवीन पाणी मावेल का? तुम्हीच सांगा…नाही ना. अगदी तसच.मन रिकाम असेल तरच गुरुकृपा त्यात साठते.
हे ऐकल्यावर मन थोड नाराज होईल.. नाराज या साठी..आपल भांड रिकाम आहे की भरलेल, हे आपल्यालाच कळत नाही ना? आपले रोजचे व्यवहार, कामाची चिंता, नात्यांतले ताणतणाव, हे सगळं मनात इतक साचलेल असत की आपण देव्हाऱ्यासमोर उभे असतो तेव्हाही डोक्यात उद्याच्या कामाची यादी सुरूच असते. मग अशा गच्च मनाने वाडीला जाऊन काय उपयोग, असा विचार मनात येऊन जातो..
#दत्तरूप
पण थोड थांबून विचार करायला हवा. भांड रिकाम करण म्हणजे मन पूर्णपणे शून्य करण मुळीच नाही बर.. आणि. तेवढ कुणालाच जमत नाही, आणि तेवढी अपेक्षाही गुरुकडून नसते. रिकामेपण म्हणजे इतकच, त्या क्षणापुरत मागण बाजूला ठेवण. हातातली यादी खिशात ठेवून फक्त तिथे उभं राहण. हे कठीण वाटत, पण अशक्य नाही.
लहान मुलाकडे बघितल की हे सहज कळत. लहान मूल आईजवळ जाताना काही मागायलाच जात अस मुळीच नसत. कधी ते नुसत जवळ बसायला जात, कुशीत डोक टेकवायला जात. तिथे मागण मुळीच नसत, फक्त असण असत… पटतंय ?? तेच नात गुरुशी जुळवता आल तर भांड आपोआप रिकाम होत जात..
म्हणूनच वाडीत जाऊनही काही भक्तांना काहीच जाणवत नाही अस काहीस बहुतांशी भक्ता सोबत होत… पण वाटत तेव्हा त्यांनी स्वतःला दोष द्यायची गरज नाही. मन रिकाम होण ही एका दिवसाची गोष्ट नाही. ती एक सवय आहे, एक सराव आहे. आज नाही जाणवल तर उद्या जाणवेल, या जन्मी नाही तर पुढच्या भेटीत जाणवेल. गुरु कधीच घाई करत नाहीत, आणि भक्ताने तरी का करावी?
खरी गोष्ट अशी आहे की मन रिकाम करण्याचा प्रयत्न करण हीच अर्धी वाट चालून झाल्यासारख आहे. बाकीची वाट गुरुकृपाच चालवते. आपण फक्त दार उघड ठेवायच, आत कोण कधी येईल हे आपण ठरवायच नसत.
म्हणून पुढच्या वेळी दत्त महाराजांच्या पादुकांनसमोर उभ राहताना एवढंच लक्षात ठेवाव. काही जाणवल नाही तरी हरकत नाही. उभं राहण हेच पुरेस आहे. बाकीच गुरुंवर सोडून द्याव…बरोबर ना???
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
ll © दत्तरूप ll
#shridattarup #dattaguru #narsobachiwadi #sprituality #faith #blessings #dattamaharaj #dattatreya

GIPHY App Key not set. Please check settings