Marathi Movie Circuit
रितेश देशमुख(Rithesh Deshmukh) आणि जेनेलिया(Jenelia) च्या वेड चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, वैभव तत्ववादी(Vaibhav Tatwawadi) आणि हृता दुर्गुळे(Hruta Durgule) यांचा सर्किट(Marathi Movie Circuit) चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा सर्किट म्हणजेच वेड लावण्यात यशस्वी होणार की नाही हे ७ एप्रिलला कळेलच.
इथे वेड चित्रपटाचा संदर्भ देण्याचे मुख्य कारण म्हणजे, ज्या वेड चित्रपटाने ५० करोड पेक्षा जास्त कमाई केली तो दक्षिणेतील मजिली या चित्रपटाचा रिमेक होता आणि वैभव तत्ववादी(Vaibhav Tatwawadi) आणि हृता दुर्गुळे(Hruta Durgule) यांचा सर्किट हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झालेल्या दुलकर सलमान(Dulquer Salmaan) आणि साई पल्लवी(Sai Pallavi) यांच्या “काली” या चित्रपटाचा रिमेक आहे.
चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
Marathi Movie Circuit Trailer
Marathi Movie Circuit
चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे, ‘सर्किट’ सिनेमाची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर?(Madhur Bhandarkar) यांनी केली आहे. या सिनेमातून मधुर मराठी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आकाश पेंढारकर(Akash Pendharkar) यानं सांभाळली आहे. आकाश हा प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा नातू आहे. आकाश देखील या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. याआधी आकाशनं कच्चा लिंबू, होम स्वीट होम, मस्का, भेटली तू पुन्हा,पावनखिंड या मराठी सिनेमांची प्रस्तुती केली आहे. तर चोरीचा मामला या सिनेमाची निर्मिती त्यानं केली होती. सिनेमॅटोग्राफर म्हणून शब्बीर नाईक यांनी काम पाहिले असून संकलन दिनेश पुजारी यांचे आहे तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. येत्या ७ एप्रिलला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
वैभव तत्ववादी(Vaibhav Tatwawadi) आणि हृता दुर्गुळे(Hruta Durgule) हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, याआधी दोघांनीही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम करत स्वतःची अशी वेगळी ओळख मनोरंजन विश्वात निर्माण केली आहे. रमेश परदेशी हे सुद्धा या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
अँक्शन , रोमान्स आणि थ्रिलरचा मसाला असलेला मराठी चित्रपट सर्किट (Marathi Movie Circuit Releasing On 7th April) ७ एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
Marathi Movie Circuit Produced by Madhur Bhandarkar, Directed by Akash Pendharkar Starring Vaibhav Tatwawadi and Hruta Durgule releasing on 7th April 2023.
***********************************************************
Marathi Actresses wiki / Biography
Marathi Actors wiki / Biography
The post Marathi Movie Circuitt – मराठी चित्रपट सर्किट appeared first on HALTI CHITRE.
GIPHY App Key not set. Please check settings