परमेश्वर दयाळू आहे आणि श्रेष्ठ उपकारकर्ता आहे, यात तिळमात्र शंका नाही. मानवजातीला त्याने मोठ्यांत मोठे असे काही दिले असेल, तर ती म्हणजे वाणी.
आता बोलता आल्यावर माणूस ही कला आत्मसात करणारच. पूर्वी मनुष्यप्राण्याच्या वैभवकाळी वक्तृत्वकला ही तत्त्वज्ञ, कवी, नट आणि शास्त्रज्ञ यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण पुढे मनुष्यजातीचा ऱ्हास होऊ लागला आणि वक्तृत्वकला ही भाषण करणे, या दशेप्रत येऊन पोहोचली.



GIPHY App Key not set. Please check settings