in

मी…

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

फुलांची पायवाट सोडून 
काट्यांचा रस्ता निवडला 
कारण…
तिथे काटा रुतला तर 

तो काढायला मी हवी ना !

आगीच्या वणव्यात 
झोकून दिले स्वतःला 
कारण…
आगीची प्रत्येक झळ 
झेलायला मी हवी ना !

नियतीलाही मुक्त केले 
सर्व दोषांच्या पाशातून 
कारण 
नशिबाचाही काय दोष ?
कारण मी मी च आहे ना !

कुणाचे मन दुखावणे 
हे पाप समजून वागणे 
कारण 
स्वतःला दुखावणे पुण्य 
हीच तर मी ची संकल्पना !

मी…मी…मी 
खूप विश्वास होता या मी वर 
खूप ताकद होती या मी मध्ये 
खूप माज होता या मी चा 
मी आहे म्हणून सर्व जग सुंदर आहे 
ते नसेल तर मी ते सुंदर करेल 
मी सर्व करेल…मी सर्व झेलेल…मी सर्व सोसेल 
किती आत्मविश्वासाने सजला होता हा मी !

आज ते सर्व जगच 
मी सोबत न उरले 
मी च्याच संकल्पनेने 
पुरता घात केला 

तर मग प्रश्न हा उरतो, 
या मी चे अस्तित्व खरंच इथे उरावे ?
एवढे काय सर्व विस्कटेल, 
जर जगात हा मी च नसेल ?

– रुपाली ठोंबरे 

​Read More 

Report

What do you think?

Written by Rupali Thombare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

पु.ल. – एक आनंदयात्रा – (गिरीश पाठक)