in

बदलता सिनेमा आणि ‘एआय’चे युग!


देशात
स्वातंत्र्याचा लढा जोरात होता तेव्हा भारतीय सिनेमा मुख्यत्वे मायथॉलॉजिकल
पौराणिक विषयांवर आधारित असायचा.



पन्नासच्या दशकात हिंदी सिनेमात आदर्शवाद हा मुख्य विषय असायचा.
नायक शिक्षक
, मजूर, शेतकरी असत;
क्वचित डॉक्टर, वकील देखील असत, आणि शहरातल्या / गावातल्या अविवेकी व्यक्तीविरोधात त्याचा संघर्ष असे.

साठच्या दशकात आदर्शवादाला रोमँटीसिझमची जोड मिळाली आणि आदर्श
प्रेमी युगुल सिनेमाच्या केंद्रस्थानी दिसू लागलं. त्यांच्या प्रेमात अडथळे
आणणाऱ्या गोष्टी आताच्या काळात आपल्याला चौकटबंद वाटत असतील मात्र त्या काळात
नैतिकता
, विवेक, आदर्शवाद, त्याग, करुणा आस्था यांना जे महत्व होतं ते पाहू
जाता त्या चौकटी कालानुरूपच होत्या असे म्हणावे लागेल.

सत्तरच्या दशकात सिनेमामध्ये आर्थिक सामाजिक विषमता हळूहळू समोर येऊ
लागली. नायक नायिका यांच्यातील कुणीतरी गरीब असायचं आणि तरीही ते एकमेकावर प्रेम
करायचे. सोन्याची बिस्किटे आणि घड्याळे यांची स्मगलिंग करणारे स्मग्लर्स या काळात
हिंदी सिनेमाच्या खलनायकीत रुजले होते. झाडाआड लपून प्रेम करणारे कपल असायचे आणि
फुलाला फुल बिलगल्याचे दाखवले जायचे.

ऐंशीच्या दशकात अन्यायाविरोधात पेटून उठणारा नायक सिनेमाच्या
केंद्रस्थानी आला
, या दशकाने नायिकांचे महत्व विलक्षण कमी
केले. गुंडांना झोडपून काढणारा
, वाईट प्रवृत्तीच्या लोकांना
मारणारा नायक स्थिरावला. नायिकेवर / सहनायिकेवर बळजोरीची दृश्ये सिनेमात सर्रास
दिसू लागली मात्र त्यात प्रतीकात्मकता असे
, खलनायकाने तिचे
हात पिरगाळलेले असत आणि तिच्या बांगड्या फुटलेल्या दाखवल्या की तिच्यावर बळजोरी
झालीय असे प्रेक्षक ओळखून घेत! साधा मामला होता!

नव्वदच्या दशकात नव्या नायकांनी प्रेमाची नवी भाषा शिकवली, नायक / नयिका यांची पार्श्वभूमी विदेशात दिसू लागली. प्रेम थोडंसं बोल्ड
होऊ लागलं. लीप लॉक किसिंग सीन दिसू लागले. भव्य दिव्य छप्परफाड श्रीमंती चकचकाट
यांना नकळत स्थान मिळत गेले. स्मगलिंग करणारे खलनायक मागे पडले आणि ड्रग्सची नशा
विकणारे
, हत्यारे विकणारे खलनायक उदयास आले.

दोन हजारच्या दशकात हिंदी सिनेमा आणखीन बदलला. प्रेमाची भाषा अधिक
मोकळी ढाकळी झाली. सिनेमा डिजिटल झाला. तांत्रिक सफाई मोठ्या प्रमाणात दिसू लागली.
बोल्ड सीन्सची भरमार चर्चेतून निघून गेली. वेगवेगळ्या कथाविषयांनी जम बसवण्याचा
प्रयत्न करत असतानाच सामाजिक विषयही मोठ्या प्रमाणात दिसू लागले. राजकीय
व्यक्तींची कॅरेक्टर्स या काळात सेट झाली.

दोन हजार दहाच्या दशकात देशभक्तीचा, इतिहासातील
नायकांच्या सिनेमांचा ट्रेंड सेट झाला. सीमापार देशविघातक शक्ती आणि देशांतर्गत
दहशतवादी शक्तींचा बिमोड करणारे नायक स्थिरावले. बलदंड नायक आणि देखण्या बाहुल्या
असणाऱ्या नायिका असं चित्र मुख्यत्वे दिसलं.

आताच्या दशकात विशिष्ट राजकीय सामाजिक नॅरेटिव्ह सेट करणारे सिनेमे
मोठया संख्येने निर्मिले गेलेत मात्र गतदशकात त्याला जसे यश मिळत होते तसे यश आता
मिळताना दिसत नाही. एका विशिष्ट पॅटर्नसाठी हे दशक झगडत असले तरी मोठया प्रमाणात
हिंसाचार
, अत्याचार, सफाईदार तांत्रिक
अंगे यांची सरशी होताना दिसते. कोणत्याही विषयाची
, भाषेची,
देशाची सीमा नसणाऱ्या ओटीटीचा धुमाकूळ हे सद्य दशकाचे मुख्य
वैशिष्ट्य सांगता येईल.

या सर्व प्रवासात अपवाद असणारे अनेक सिनेमे प्रत्येक दशकात बनत
गेले. समांतर सिनेमाची चळवळ येऊन गेली. कलात्मक सिनेमेही निर्मिले गेले. सायफाय
व्हिलनचा बारीकसा चंचुप्रवेश होऊन गेला
, सुपरहिरो टाईपचे
सिनेमेही येऊन गेले.

प्रत्येक दशकात अपवाद असणारे बरेच सिनेमे येऊन गेले.
मात्र या संपूर्ण प्रवासात विज्ञान, अवकाश
यांना हिंदी सिनेमाने जवळपास शून्य स्थान दिले. जे अपवाद होते ते अगदीच ढोबळ
पद्धतीचे होते.

आताचा हा ट्रेंड बदलून वीसेक वर्षांनी तरी हिंदी सिनेमांचे
विषयवैविध्य बदलेल की नाही हे सांगता येत नाही कारण सिनेमाचे स्वरूपच बदलत चाललेय.
स्फिअर थिएटर्स सिनेमाची व्याख्या बदलू शकतात. ही दूरदृष्टी अजूनतरी हिंदी
सिनेमांत आलेली दिसत नाही. हिंदी सिनेमा आणि सिरियल्स पाहणाऱ्या प्रेक्षकांचे
थोराड होत जाणे खरी समस्या होईल.

आता बाल्यावस्थेत असणाऱ्या जनरेशन अल्फाचे, आवडते
दृकश्राव्य माध्यम नव्या तंत्रज्ञानावर आधारित एआय बेस्ड सिनेमांचे असले तर मोठ्या
कलाकारांना घेऊन बनवलेले सिनेमे मोडीत निघतील का
? कमांड देऊन
स्वतःसाठी एखादा सिनेमा बनवला जाईल का
? आताशा आपण तीन ते दहा
मिनिटांच्या क्लिप्स घरबसल्या बनवू शकतोय.

येत्या काही वर्षात या माध्यमाने सिनेमे बनवले तर? अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती नायक नायिका म्हणून लोकप्रिय होतील का?
हे कार्टून्सचे मानवीकरण असेल का? हिंदी
सिनेमाची काय अवस्था असेल याचे आडाखे बांधताना मराठी सिनेमाविषयी काय लिहावे
?
की लिहिण्यासारखे काहीच नसेल?

प्रत्येक दशकाचा फ्लेवर सिनेमात प्रतिबिंबित होत असतो, आगामी दोन ते तीन दशकात तंत्रज्ञान जे सुसाट भरारी घेतेय त्याचे प्रतिबिंब
नक्कीच पडू लागलेय. यात मानवी मनाचा थांग शोधला जाईलच मात्र त्याची अभिव्यक्ती कशी
असेल हे पाहणे इंटरेस्टिंग असेल. ड्यूनसारखे सिनेमी त्यासाठी पायाचा दगड ठरतील का
?

समीर गायकवाड

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Feed back अरिहंत सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल , जयसिंगपूर बाबत माझे मनोगत