in

डेथ मार्च ऑफ मिरपूर, १९४७

…दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर, फिलिपाइन्स, बटान या बेटांच्या जंगलात जे दोस्तराष्ट्रांच्या आणि जपानच्या सैन्यामध्ये जे युद्ध झाले त्यात काय झाले हे आपण प्रथम पाहू, पण हे लक्षात घ्या की या लेखाचा विषय हा नाही..

बाटानचा डेथ मार्च

आकाशातून संरक्षण नसल्यामुळे अमेरिकेच्या एशियाटिक फ्लीटच्या प्रमुखाने, ॲडमिरल हार्ट याने त्याचे हे नौदल जावाच्या समुद्रात नेले व तेथे त्यांनी दोस्तांच्या ताकदवान सैन्याशी हातमिळवणी केली. अमेरिकेच्या या युद्धातील मूळ योजनेप्रमाणे जनरल मॅकार्थरच्या सैन्याने अमेरिकेचे पॅसिफिक नौदल तेथे येईपर्यंत फिलिपाईन्स लढवायचे असे ठरले होते. या नौदलाच्या युद्धनौका पर्ल हार्बर येथे नष्ट झाल्यामुळे ही योजना मृत्युपंथाला लागली, पण या ऐवजी कुठली योजना राबवायची याबद्दल मात्र काही आदेश नव्हते. जपानने मात्र हातात पडलेल्या विमानतळांचा वापर करून पुढे घुसलेल्या त्यांच्या फौजांचा रसद पुरवठा सुरळीत केला. लवकरच जपान आणि अमेरिकन सैनिकांचे प्रमाण चारास एक असे झाले. जपानच्या या प्रचंड सैन्यापुढे व वेढले गेलेल्या बाटानच्या जंगलातील अमेरिकन सैनिकांचा निभाव लागणार नाही हे उमजून राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी स्वत: जनरल मॅकार्थरला फिलिपाईन्स खाली करण्याचा आदेश दिला. येथून निसटून जनरल मॅकार्थर ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या पोहोचल्या म्हणाला, “मी फिलिपाईन्स सोडले आहे पण लक्षात ठेवा, मी परत येणार आहे.” हे त्याचे वाक्य इतिहासप्रसिद्ध आहे.

९ एप्रिलला बाटान पडले. जपानच्या सेनेने भुकेने अर्धमेले झालेल्या ७८ हजार अमेरिकन व फिलिपाईन्सचे सैनिक ताब्यात घेतले. या अत्यंत वाईट परिस्थितीत असलेल्या सैनिकांना जपानी फौजांनी ६५ मैल चालवत युद्धकैद्यांच्या छावणीत टाकले. या पायपीटीलाच ‘बाटान डेथ मार्च’ या नावाने ओळखले जाते. २००० हजार सैनिक या संकटातून वाचले आणि कॉरेगीडॉरला पोहोचले. तेथे त्यांनी २७ दिवस तग धरला. त्यांचे मुख्यालय व इस्पितळ डोंगरात गुहेत असल्यामुळे त्यांनी पुढचे अजून ५३ दिवस तग धरला. अमेरिकन सैन्यदलात त्याकाळी कॅव्हेलरीच्या पलटणी होत्या. त्या सैनिकांनी आपले घोडे मारून खाल्ले. घोडदळाची अखेर ही अशी जेवणाने झाली ती कायमचीच.

शेवटी मलेरिया, दोनच दिवस पुरेल एवढा पाण्याचा साठा यामुळे या बेटावरील अमेरिकेच्या तळानेही ६ मे रोजी शरणागती पत्करली. फिलिपाईन्सचे संरक्षण करताना झालेल्या या लढायांच्या अमेरिकेच्या इतिहासात कहाण्या झाल्या. या लढाईत २००० अमेरिकन सैनिक ठार झाले, ११५०० युद्धकैदी झाले तर जपानचे ४००० सैनिक ठार झाले. फिलिपाईन्सचे जे नागरिक ब्रिटिशांशी इमान बाळगून होते त्यांचा निर्दयतेने जो छळ करण्यात आला, तो कल्पनेच्या पलिकडे होता. एका इतिहासकाराने त्याचे वर्णन करताना लिहिले, ‘संगीन खुपसायच्या सरावात जिवंत कैद्यांचा वापर करण्यात येई.’ त्यांच्या या अत्याचारांमुळे आग्नेय आशियाला बुशीडो व त्यांच्या तत्वज्ञानाचा खरा अर्थ कळला. या डेथ मार्चची जगभर चर्चा झाली. पण या पेक्षाही भयानक असा डेथ मार्च अखंड भारतात घडला, त्याची कोणी चर्चा करत नाही..

मिरपूरचा डेथ मार्च

नाझींनी केलेल्या ज्युंच्या शिरकाणाबद्दल आपण वाचलेले आहे. आफ्रिकेमध्ये मुसलमानांनी केलेल्या ख्रिश्चनांच्या शिरकाणाबद्दल आपण वाचलेले आहे, कंबोडियामध्ये झालेल्या कत्तलींविषयी आपण वाचले असेल, पण १९४७ साली मिरपूर येथे झालेल्या शिख व हिंदूंच्या कत्तलींविषयी आपल्याला फारसे माहिती नसते. आज ते जाणून घेऊया. या हिंसाचारात २०,००० हिंदू आणि शिखांची कत्तल झाली होती एवढे सांगितले म्हणजे याची भिषणता आपल्या लक्षात येईल. उदा. अलिबेगच्या तुरुंगात ५००० हिंदू/शिख कैदी होते (गुन्हेगार नव्हते, पण त्यांना तेथे कैद करून ठेवले होते) या ५००० पैकी १६ मार्चला फक्त १६०० माणसे जिवंत बाहेर आली. हेही लक्षात ठेवले पाहिजे की ही फाळणी धर्माच्या आधारावर मुसलमानांनी करून घेतली होती आणि काही लोकसंख्या मागे ठेवली गेली, ज्याचा उपयोग पुढे कधितरी करता आला असता. असे नसते तर पुढे एवढ्या भिषण दंगली झाल्याच नसत्या. या निरपराध हिंदूंना इस्लामचा खरा अर्थ कळला असे म्हणावे लागेल. (हिंदूंना आपल्या शेजाऱ्यांचा म्हणजे इस्लामी जनतेचे खरे स्वरूप लक्षात आले) लक्षात घ्या बटान डेथ मार्च हा दोस्तांच्या हरलेलल्या ११००० सैन्याचा झाला होता. मिरपूर डेथ मार्च हा सामान्य नागरिकांचा झाला होता.

मिरपूर हे एक हिंदूस्थान आणि पाकिस्तानच्या सहरद्दीवरचे जम्मू काश्मिरमधील छोटे शहर आहे. आता ते पाजिस्तानने बळकावले आहे. २५ नोव्हेंबर १९४७ या दिवशी पाजिस्तानचे आक्रमण झाल्यावर हिंदू आणि शिख समुदायाने पलायन करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने हे स्थलांतर योग्य रितीने न केल्यामुळे बरिचशी लोकसंख्या मिरपूरमध्येच राहिली. पाकिस्तानी लष्कर आणि सशस्त्र पठाणांच्या हाती ही जनता आयतीच सापडली.

२५ नोव्हेंबरला मिरपूरमध्ये २५००० हिंदू व शिख राहात होते. पाकिस्तानी तोफखान्याच्या गोळाबारीत पहिल्याच दिवशी २५०० लोक मृत्यूमुखी पडले. अजून २५०० लोक जम्मू काश्मिरला माघार घेणाऱ्या भारतीय लष्कराबरोबर पळाले. उरलेली २०,००० जनता आक्रमकांच्या तावडीत सापडली. यांना हाकलत अलिबेगला नेण्यात आले. या प्रवासात पाकिस्तानी आणि पठाणांनी १०,००० हिंदू/शिख माणसांची कत्तल केली आणि ५००० मुलींना आणि स्त्रियांना पळवून नेले. ५००० हिंदू/शिख कैदी मरणोन्मुख अवस्थेत अलिबेगला पोहोचल्यावर त्याना ताबडतोब अटक करण्यात आली आणि तुरुंगात डांबण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात बर्माच्या जंगलात जेव्हा सुरुवातीला दोस्तराष्ट्रांच्या सैन्याचा पराभव झाला, तेव्हा झालेल्या युद्धकैद्यांना बटान येथे चालवत नेण्यात आले. त्या कैद्यांचे अतोनात हाल जपानी सैन्याने केले. या मार्चला डेथ मार्च ऑफ बटान या नावाने ओळखले जाते. त्यापेक्षाही भयंकर हा मिरपूर मार्च होता, कारण येथे मार्च संपल्यानंतर बहुतेकांची कत्तल करण्यात आली.

हा जो तुरुंग आहे हा पूर्वी एक गुरुद्वारा होता. पाकिस्तानी फौजेने त्याचा तुरुंग केला आणि दुर्दैवाने या गुरुद्वारामध्येच हे अत्याचार झाले. पहिल्या वीस दिवसातच १०० तरुणांना रात्री तुरुंगाबाहेर नेऊन गोळ्या घालण्यात आल्या. काहींची तलवारींनी डोकी उडवण्यात आली तर काहींना भोसकून मारण्यात आले. १००० कैदी ज्यात स्त्रिया आणि आजारी माणसे होती, ते उपासमारीने मृत्युमुखी पडले. अंदाजे रोज वीस माणसे मृत्यूमुखी पडत होती. हा गोंधळ जवळजवळ दोन महिने चालला होता. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसची समिती अलिबेगला भेट देण्यास आली तेव्हा त्यांनी हे हत्याकांड थांबवले तेव्हा फक्त १६०० माणसे जिवंत राहिली होती. याच समितीने १००० स्त्रियांची सुटका केली. या कत्तलींमध्ये अनेक कुटुंबांचा निर्वंश झाला…

इतिहास आठवण्यासाठी थोडेसे मागे जावे लागेल.

१९४७ साली भारतातील ५२५ संस्थाने खालसा करून भारतात विलीन करण्यात आली. त्यासाठी जो मसुदा तयार करण्यात आला त्यात या संस्थानिकांपुढे दोन पर्याय ठेवण्यात आले होते. एकतर भारतात विलीन व्हा नाहीतर पाकिस्तानात. ब्रिटिशांनी जी संस्थाने पाकिस्तानच्या जवळ होती त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला दिला, पण ज्या ठिकाणी मुसलमानांची लोकसंख्या जास्त होती, त्यांनाही पाकिस्तानात विलीन होण्याची इच्छा होती. जम्मू काश्मिरही त्यात होतेच, कारण यथे मुसलमानांची लोकसंख्या ६०% होती. राजा हरीसिंग यांना तर जम्मू कश्मिर एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे होते त्यामुळे त्यांनी दोन्ही देशांबरोबर तटस्थ राहण्याचा विचार केला. (हैद्राबाद संस्थानामध्ये या उलट परिस्थिती होती. तेथे हिंदू लोकसंख्या मोठी होती) अर्थात पाकिस्तानला हे काहीच मान्य नव्हते. मुस्लीम लोकसंख्या जास्त असल्यामुळे जम्मू काश्मिर पाकिस्तानमध्येच आले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता व त्यासाठी शस्त्रे उचलायचीही त्यांनी तयारी केली होती. यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर प्रॉव्हिन्सचे पठाण यांची एक फौज तातडीने उभी करण्यात आली. ही सगळी मोहीम पाकिस्तानी जनरल अकबर खान यांच्या अधिपत्त्याखाली चालवण्यात आली. १ ऑक्टोबरला जम्मू काश्मिरवर हल्ले चढवण्यात आले. त्या तडाख्यातून मुझफराबाद, बारामुल्ला, पुंछ व मिरपूर सुटले नाहीत. या हल्ल्यात १००,००० हिंदू/शिख ठार मारण्यात आले. जाळपोळ करण्यात आली आणि स्त्रियांवर बलात्कारही करण्यात आले. ब्रिटिशांनी दोन्ही बाजूला २०,००० सैनिकांची नेमणूक केली होती. या सैनिकांना अतंर्गत सुरक्षा करायची होती, पण जम्मू काश्मिर इतका मोठा आहे की बाहेरून आक्रमण झाले तर त्याला तोंड देण्यासाठी ही फौज नगण्यच होती.

२३ ऑक्टोबरला जम्मू- काश्मिरचे पंतप्रधान महाजन यांनी महाराजा हरिसिंग यांना पंडीत नेहरू यांची दिल्लीमध्ये भेट घेण्याचा सल्ला दिला. नतद्र्ष्ट नेहरूंनी ही भेट घेण्याचे नाकारले व एक अट पुढे ठेवली. १ काश्मिरमधील मुस्लिमांचे पुढारी शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून सुटका करावी आणि २ शेख अब्दुल्ला यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करावी. या अटी मान्य करण्याशिवाय महाराजांच्या पुढे दुसरा पर्याय उरला नाही व त्यांनी २५ ऑक्टोबरला भारतात विलीन करण्याच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. दुसऱ्या दिवशी ही कागदपत्रे घेऊन नेहरूंचे खास दूत व्हि.पी मेनन दिल्लीला पोहचले. २६ तारखेला जम्मू काश्मिर भारतात विलीन झाला. ३० तारखेला शेख अबुल्ला यांची प्रशासकपदी नेमणूक झाली. २६ तारखेला हे सगळे झाले, पण तोपर्यंत पाकिस्तानी फौजांनी आणि पठाणांनी अर्धा काश्मिर घशात घातला होता. प्रदेशातील बौद्ध, हिंदू, शिख आणि मवाळ मतवादी मुस्लिमांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. अर्थात मुसलमानांचा हा अल् तकिया होता. पुढे काय झाले हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. या तथाकथिक उदारमतवादी मुसलमानांनीच आपल्या हिंदू शेजाऱ्यांच्या पाठीत सुरे खुपसले. हे सगळे रामायण घडल्यावर भारतीय सैन्याने आपले सैन्य हवाईमार्गाने श्रीनगरमध्ये उतरवण्यास सुरवात केली. या सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे आणि पठाणांचे आक्रमण रोखले हे एक आश्चर्यच मानले पाहिजे.

२५ ऑक्टोबरला महाराजाने श्रीनगर सोडून जम्मूला पळ काढला. याच काळात विश्वासघाताचा एक नमुना पहाण्यास मिळाला – जनरल पलित यांनी लिहून ठेवले आहे, – ‘‘पाकिस्तानी लष्कर आणि स्थानिका पाकिस्तान धर्जिण्या मुसलमानांनी जम्मू काश्मिरमध्ये येणाऱ्या सर्व वाटा रोखल्या. त्या वेळी जम्मू काश्मिरच्या सैन्यात ५०% मुसलमान सैनिक आणि आधिकारी होते. हे सगळे पाकिस्तानी सैन्यास जाऊन मिळाले. (जे के रायफल्सच्या रेजिमेंटस्). त्यांनी सगळ्या हिंदू सैनिकांची आणि आधिकाऱ्यांची कत्तल केली ज्यामुळे जम्मू काश्मिरचे रक्षण करणे भयंकर कठीण झाले. या तथाकथित मुक्त झालेल्या प्रदेशाचे नाव ठेवण्यात आले आझाद काश्मिर. मिरपूरला जी हिंदू शिख मंडळी चालवत नेण्यात आली, त्या प्रवासात अनेक हिंदू स्त्रियांनी जोहार केला.. मला वाटते हा हिंदूस्थानातील शेवटचा जोहार असावा..(अर्थात अजूनही होत आहेत, पण ते वैयक्तिक पातळीवर) या दंगलींचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, काश्मिरची मुस्लिम लोकसंख्या बहुतांश शिया आहे. त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या सुन्नी मुसलमानांना साथ देऊन हिंदूंची कत्तल केली. आजही काश्मिरचे शिया इराणच्या खोमेनीसाठी रस्त्यावर उतरतात यावरूनच काय समजायचे ते समजून घ्या. या जमातीला देशाशी काही देणेघेणे नाही हे त्यांनी वारंवार सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे.. कारण पहेलगामच्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या हिंदूंसाठी ही शिया मंडळी रस्त्यावर उररलेली दिसली नाहीत. म्हणजे हिंदूंचे मुडदे पडले तर ठीक चालले आहे असा यांचा समज असावा.

प्रश्र्न हा आहे, की हिंदू हे सगळे विसरणार आहेत का यातून काही शिकणार आहेत…पण बहुधा विसरतीलच. जे मुस्लीमधर्जिण्या उमेदवारांना/पक्षांना मते देतील त्यांनी धर्मद्रोह केला असेच समजले पाहिजे.. जर मुल्ला मौलवी मुस्लिम उमेदवारांना मुस्लिम जनतेने मते टाकावीत असे आवाहन करतात, तर सगळ्या हिंदू धर्मगुरूंनी, विशेषतः चारही शंकराचार्यांनी असे आवाहन करण्यास काय हरकत आहे, असा रास्त प्रश्र्न मला पडलाय…

– जयंत कुलकर्णी.

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

एक होती माया