नवरा बायकोची भांडणे कुठे होत नाहीत . पण त्या भांडण्यात काही वेगळीच मजा असते ..रुसवे फुगवे आणि बरच काही तेच या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न करतोय .
वाद मराठी कविता
जेंव्हा जेंव्हा तिचा न माझा वाद होतो
तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा
माझ्या काळजावर वार होतो ..
ती रुसते …फुगते
लहान पोरी सारखी एका कोपऱ्यात बसते
किंमतच नाही मला घरात कवडीची म्हणत…
एकटीच स्वतःशी बोलत बसते…
मग मी हळूच तिच्या समोर येतो …
राणी राणी करत ….गोड गोड बोलतो …
पण तिचा नाकावरचा राग … इतका थोडीच स्वस्त असतो..
पण ती चिडली …की कुणास ठाऊक
भारी वाटत ….नाही तरी आज काल
कोण इतक्या हक्कान भांडत ..
तिला कित्तेक विनवण्या करून होतात
तरी तिच्या गालावरच्या खल्या .. कोमेजलेल्या राहतात..
असाच वेळ निघून जातो …संध्याकाळचे ६ ते रात्रीचे ९ होतात
मग नकळत कळून जात …आज पुन्हा एकदा ती तेच करणारं
स्वयंपाक विभागाचे कामकाज बंद असणार …
मग नेहमी सारखं माझ्या मनात येणार ….
रुसलिय ती…किती वेळ मी उगाच तो वाद धरू
चला तिच्याच आवडते …छोले- भटुरे ऑर्डर करू …
तीच्या न कळत ती ऑर्डर यावी..
छानशी सजवून जेवणाची थाळी
तिच्या समोरचं …न्यावी
चूक आपलीच होती मान्य करत
दोन चिऊ चे घास तिला भरवावे
दोन घास आपण खावे …
जेवण संपता संपता … दोघांनी हसून घ्यावे
वाद नक्की होता तरी काय..
पुन्हा दोघांनी विसरून जावे ….पुन्हा दोघांनी विसरून जावे ….
अभय शेजवळ
दिनांक: १८/७/२०२३
बायकोवरील कविता प्रेमातील भांडण | Husband and Wife Relationship | Marathi Kavita wife | Marathi Prem Kavita | पत्नी कविता मराठी |Best Marathi Kavita Marathi Poems |Marathi Kavita For Wife | Poems for Wife | Love Poems
GIPHY App Key not set. Please check settings