in

पंचक

पंचक निमित्याने :- 🖐🏼

ज्योतिष शास्त्रातील एक  संकल्पना ( प्रचलित नियम)  घेऊन  विनोदी ढंगाने मराठी सिनेमाची निर्मिती केलीत याबद्दल सर्वप्रथम श्री व सौ माधुरी  नेने  यांचे अभिनंदन 💐💐
 
पंचकात विशाखा नक्षत्र नसते  पण काल  रात्री आम्हाला विशाखा या त्रिपाद नक्षत्रावरच पंचक लागले.
पंचक लागले खरे पण  “पंचक भावले” असे मात्र म्हणणार नाही

कोकणातील एका गावात खोतांच्या एकत्र कुटुंबात घडलेली गोष्ट. 
कोकणातील  डुक्करला मांजर आडवे गेल्यानंतर ही डुक्कर ( आपल्या भाषेत टमटम)  मागे घेऊ न देता पुढे दमटवणा-या  नायकाच्या वडीलांचे तो घरी पोहोचण्या आधी निधन झालेले असते. नायक आणि त्याचे वडील नास्तिक. सहा महिन्यापूर्वीच वडिलांनी ‘ देहदानाचा ‘ संकल्प केलेला आहे . त्यात  जोशी बुवा येऊन ‘पंचक ‘ लागले आहे असे डिक्लेअर करतात आणि खोत कुटुंब दुहेरी संकटात सापडते.
तेथून पुढे श्रध्दा/ अंधश्रध्दा , आस्तिक /नास्तिक याचा झालेला गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो गुंता व्यवस्थित सुटला असे वाटत नाही.  शेवटपर्यंत विषय तसाच अधांतरीच राहिला आहे असे वाटत राहिले
कलाकारांमधे विद्याधर जोशींनी साकारलेले गुरुजींचे पात्र जाम आवडले. 
पंचक शांती वेळचे त्यांच्यावर चित्रीत झालेले इंग्रजी गाण्यावरचे विडंबन तर अफलातून क्रिएटिविटी. 
प्रासंगिक विनोद,  इतर कलाकारांच्या भूमिका ठिकठाक.  
‘माधुरी दिक्षीतचा एक ही सिनेमा आम्ही सोडलेला नाही!’  हे ती नायिका असताना ठिक होते,  इथे ती ( माधुरी नेने ) फक्त निर्माती आहे 😬 
 तेंव्हा दोन तास खर्च करुन थेटरात जाऊन सिनेमा पहावा एवढा काही खास नाही , टीव्हीवर लागेलच. 
 ( त्यापेक्षा २ तास वेळ काढून उत्तम ज्योतिषाने कडे जाऊन आपली पत्रिका काढा किंवा काढलेली दाखवा 😷) 
 या शास्त्रातील  अभ्यासकांकडून, या विषयाची आवड असणा-यांकडून किंवा या विषयी जुजबी / ऐकीव माहिती असल्याने घरातील कुणी गेल्यानंतर तातडीने ‘पंचक’ लागलंय का? अशी विचारणा करणा-यांकडून भावना दुखावली जाणे, निषेध वगैरेंची शक्यता असताना  कुठेही शास्त्राची खिल्ली उडवली जाणार नाही याची मात्र काळजी घेतली आहे
संवेदनशील विषयात आजकाल कधी, केंव्हा ,कशा, कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम राहिलेला नाही.  
नेंने दांपत्यांच्या निर्मीतीच्या या पहिल्याच प्रयत्नाला कितपत यश येईल हे सांगणे अवघड आहे. ही सुरवात आहे, पुढे एखादा आणखी  उत्तम मुहूर्त पाहून नवीन निर्मितीसाठी सुरुवात करा हे त्यांना सांगणे.  काय सांगा मराठी/ हिंदी सिनेमा निर्मितीचे ‘पंचक’ तुमच्या नशिबात लिहिलेले असेल.
त्यासाठी शुभेच्छा 💐💐 
पुढील काही निर्मितीसाठी  काही उपयुक्त विषय / नाव सुचवून ठेवतो.
१) ‘ बेटा मंगळवाला’
२) ‘  तेजाब भरी पनौती ‘
३) ‘  साजन एक प्रीती षडाष्टक ‘
४) ‘ दशा’ तो ‘पागल’ है
५)  ‘कर्क तेरा गुरु दिवाना’
६)  ‘राहू खरा-नायक’
( ज्योतिष अभ्यासक)  अमोल 
#पंचक
#माझी_टवाळखोरी 📝
मार्गशीर्ष कृ एकादशी 
०७/०१/२०२४
——————————————-

इतरांसाठी  महत्चाची गोष्ट : धनिष्ठा नक्षत्र चरण ३ व ४, शततारका,पू. भाद्रपदा ,उ.भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रावर कुणी गेले तर पंचक लागते आणि याची शांती वगैरे जी शास्त्रात सांगितली आहे ती करणे आवश्यकच असे एक अभ्यासक म्हणून आवर्जून नमूद करु इच्छितो. Loading…

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

आमसुलाची/कोकमाची चटणी