पशुपक्ष्यांत ज्या काळी मन रमायचे त्या वेळी रमले नाही, आणि आता वेळ निघून गेली. माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा! माझे बालपण शहरात गेल्याचे मला दुःखही नाही, तसेच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचेही नाही. "कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा," अशी आम्हांला एक कविता असे. लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत, बालगीत नव्हे. कावळा आम्ही रोजच पाहत होतो. पण सफेत बगळा मात्र भारताला
in Literature
GIPHY App Key not set. Please check settings