असे मध्ये एकदा घडले… तो होता “रुमी”.
हा १२०७ मध्ये जन्मलेला सूफ़ी.
म्हणजे मूळ पर्शिअन लिखाण मी इंग्लिश मधून वाचणार.
अनेकदा असे साहित्य समोर आले की सर्वात मोठा अडसर म्हणजे भाषा.
अनुवाद ह्या गोष्टीबाबत स्वतःच्याच मनात दोन भिन्न प्रवाह.
जी मूळ भाषेत साहित्यकृती आहे ती त्याच भाषेत आस्वाद द्यावी. कारण एका भाषेतला लहेजा दुसऱ्या भाषेत आणता येत नाही.
अनेक उर्दू शब्दांना मराठीत तेच सौंदर्य प्रकट होईल असे शब्द कुठून आणायचे? अनेक इंग्रजी शब्दांना मराठीत दोन तीन पर्यायी शब्द दिसतात पण त्या शब्दाचा नेमका अर्थ मिळणार एक शब्द सापडत नाही. म्हणून अनुवाद नकोत.
पण ते नाही असे ठरवले तर परिस्थिती ही मूळ मातृभाषा आणि दुसरी व्यावसायिक भाषाही अजून थोडीशीच समजली आहे, तिसरी आपण कधी शिकणार, कधी तिचा आस्वाद घेणार …. आयुष्य फार थोडे उरले आहे … अर्ध्याहून अधिक सरले आहे…
आणि अशी एखादी कविता समोर आल्यावर आपल्याला न आवडणारी गोष्ट – अनुवाद … आपल्याच हातून घडली तर काय करावे? घडू द्यावी आणि मोठ्या मनाने स्वतःला माफ करावे !
there is a field. I’ll meet you there.
When the soul lies down in that grass,
the world is too full to talk about.
Ideas, language, even the phrase ‘each other’
doesn’t make any sense.
साऱ्या कल्पनांच्याही पल्याड दूरवर विस्तीर्ण पसरलेले एक गाव आहे
जिथे कशासही योग्य – अयोग्यतेच्या पट्टीने मापले जात नाही कधीच
तिथे भेटेन मी तुला …. मनमुराद … मनसोक्त
तेंव्हा जो संवाद घडेल आपल्यात तो असेल कोणत्याच बंधनांशिवाय
कल्पनांच्या भाषेच्या अविष्कार सारे मागे पडलेले असेल
इतकेच काय आपण दोघेही दोघे असण्याची संकल्पनाही उरली नसेल
GIPHY App Key not set. Please check settings