in

वर्गमित्र स्नेहमिलन

                वर्गमित्र स्नेहमिलन

        

      सन -1993-94 ची नवजीवन हायस्कूलची दहावी बँच् व 1990- 91 ची न.प.शाळा क्र.1 ची सातवीची बँच यांचं गेट टुगेदर 5 एप्रिल 2005 रोजी गेमोजी फूड माँल , जयसिंगपूर  येथे संपन्न झाले. त्या अपूर्व सोहळ्याविषयीचे माझे मनोगत…..

एक संसस्मणीय रम्य सोहळा ।

विद्यार्थी बाळानो,

       खरं तर 34 वर्षापूर्वी आम्ही शिक्षकांनी तुम्हाला ज्ञानदान केलं.एवढ्या वर्षानंतर तुम्ही सर्वांनी आमची आठवण ठेवली.आठवणीने प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं .सर्वांना एकत्र बोलावून सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान केलात ,ही आमच्या साठी खूप सुखावह गोष्ट आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्यासारख्या सद्गुणी , सुसंस्कारित विद्यार्थ्याकडून झालेला गौरव आम्हा शिक्षकांना हत्तीचं बळ देऊन गेला. आनंदाने ऊर भरून आला. योगश आणि मित्र परिवार ने आयोजित केलेला हा नयनरम्य सोहळा नितांतसुंदर, अप्रतिम ,अपूर्व असा झाला. तुम्ही सर्वांनी इतकं छान नियोजन केलं होतं की स्वागत झाल्यापासून सोहळा संपेपर्यंत एकामागून एक असे अनेक सुखद धक्के बसले .ज्यानी आम्हाला नवी एनर्जी मिळाली.आम्ही लावलेल्या छोट्याशा आम्रवृक्षाच्या रोपांचे फळांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षात झालेले रुपांतर पाहून आपण आमराईत वावरत असल्याचा आनंद आम्ही उपभोगला.

         बाळानो तुम्ही सर्वजण स्वागताला थांबला होता. तुतारीचा कर्णमधुर स्वर आणि तुम्हा सर्वांचे उत्साही ,हसरे चेहरे, चेहऱ्यावर विनम्र भाव,आदराने केलेले नमस्कार हे सर्व पाहून आमच्या नकळत आमच्या अंतःकरणातून लाखो आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळालेत बाबानो!…

        स्टेजवर जाताना चे पार्टी पाँप्अप्स् ,चालताना तुम्ही धरलेला हात खरोखरीच अविस्मरणीय होता.सोहळ्याच्या सुरुवातीला जो परिपाठ सादर केलात ना त्यातील कल्पकता कोतुकास्पद आहे. इतक्या वर्षानंतर तुमच्या तोंडून नेहमी खरे बोलावे हा सुविचार ऐकताना मजा वाटली. बातम्या ऐकून बरे वाटले. स्वर्गीय शिक्षकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचाही सन्मान करण्याचा तुमचा मनोदय खूप आवडला.त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तुम्ही केलेला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कापेक्षाही भारी वाटला .तुम्ही गळ्यात घातलेल्या माळा तुमच्या आमच्यातील जिव्हाळ्याच्या प्रतीक ठरल्या .

        प्रत्येक शिक्षकाबद्दल त्यांच्या खास वाक्यासह तयार केलेल्या चारोळ्या या सोहळ्यातील खास आकर्षण ठरल्या.तलहा,यास्मिन, योगिता व चारोळ्या तयार करणाऱ्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चारोळ्या ऐकताना रणरणत्या उन्हात आल्हाददायक पावसाच्या सरी पडत असल्याचा सुखानुभव आला.

                         मार्मिक चारोळ्या

                         सरी पावसाच्या

                         आकर्षण ठरल्या

                         अपूर्व सोहळ्याच्या ।

        तुम्ही सर्वांच्यासाठी केलेली फेट्यांची व्यवस्था लाजवाब. स्वादिष्ट नाश्ता व रूचकर भोजन व्यवस्था करून सर्वांना तृप्त केलंत तम्ही .भोजन करतांना तुम्ही केलेल्या आग्रहाने मनही भरले.अभिजीत यातलं थोडं तरी घ्या म्हणत होता तर दुसरा जिलेबीचा घास मुखात भरवत होता.कित्ती कित्ती प्रेम दिलंत रे बाळानो मी बाळानोच म्हणेन तुम्हाला कारण तुम्ही फारच गुणी बाळे आहात.

        उर्वरित आयुष्य आनंदाने घालविण्यासाठी तुमचा हा आपुलकीचा , आदराचा, जिव्हाळ्याचा सोहळा आम्हाला सदैव टाँनिक देत राहील.

       शेवटी योगेशचे आभारप्रदर्शन म्हणजे आभारप्रदर्शनाचा उत्कृष्ट नमुना होता. स्वतः च्या चुकांची कबुली, आपण केलेल्या कामाचे प्रदर्शन न करता सर्व श्रेय मित्रांना देण्याची त्याची खिलाडूवृत्ती पाहून आम्ही तुम्हा सर्वांचे शिक्षक असल्याचा अभिमान वाटला.

                 धन्य झालो आम्ही सोहळा पाहून

                 अशीच मर्जी ठेवा मनापासून।

मनोगत प्रेषक,

डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी

शाहूनगर जयसिंपूर ।

Read More 

What do you think?

33 Points
Upvote Downvote

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

दिशाभुलीचे गणित

जागरण -पुस्तक परिक्षण