अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad | Archana’s Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita Kalank | मराठी कविता कलंक | विधवा जीवन मराठी कविता | प्रथा मराठी कविता
कलंक – मराठी कविता |kalank Marathi Kavita
पत्नी निधनानंतर तो ही झाला विधुर
मग समाजाने का घेतला स्त्री चाच सूड।।
शृंगारा पासून झाली ती दूर
पांढऱ्या वस्त्रावर आयुष्य झाले रूढ ।।
तगमग जीवाची नाही समजला कोणी
भाकडकथा रचली तिच्याबद्दल मनोमनी।।
विधवा म्हणून एकटेपणा तिच्या भाळी बांधला
एकट्या पुरुषाचा मात्र संसार नव्याने मांडला।।
स्त्री – पुरुष समानतेचा केला जरी संकल्प
विधवा म्हणून तिच्याच माथी का लागला कलंक?
– अर्चना बागुल गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings