गेल्या वर्षी मुंबईच्या कुलाबा भागातील एका बराकी पुढून जाताना मी एक दृश्य पाहिले होते. तिथे राहणारी एक तुकडी, मला वाटते, आघाडीवर चालली होती. ट्रंका रस्त्यावर आल्या होत्या. मोठमोठे लष्करी ट्रक उभे होते. त्या सैनिकांची बायका – पोरे – कुणी खिडकीतून, कुणी फाटका जवळून – मुक्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत होती. मला वाटले, पुढे जावे आणि त्या सैनिकांचा ‘जयजयकार’ करावा. पण माझ्याही मनाला ती सवय नव्हती.
in Literature
GIPHY App Key not set. Please check settings