नुकताच एका युवकाने (हा शब्द अलीकडे आला. मागे ‘पोरसवदा’ म्हणत.) मला प्रश्न विचारला, “लेखक व्हावं, असं मला फार वाटतं. मी प्रथम काय करू?” मी गंभीरपणे म्हणालो, “फेरविचार.”
“म्हणजे?”
“लेखन करून त्यावरच आपला चरितार्थ चालवावा, अशी तुमची जर योजना असेल; तर हा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही फेरविचार करावात, हे बरं, कारण मला तरी इथून पुढे साहित्याचं भवितव्य फारसं उज्ज्वल दिसत नाही. मी हे अगदी मनापासून बोलतो;
GIPHY App Key not set. Please check settings