in

शेजारीन मराठी कविता , प्रेम कविता, love poetry in marathi, shejwarin marathi kavita

 free marathi prem kavita  |  download marathi prem kavita | aathavanitli marathi prem kavita  | 

 | 
मराठी कविता :- दर्शन 
जाता येता…
ती खिडकी दिसते …
खिडकीत.. हो तीच असते…
ती माझ्या कडे बघते 
माझी ही नजर तिच्यावर असते 
 ती ही जरा हसते…
खरंच राव किती गोड दिसते…
पण या दुःखी मनाची मजबुरी असते…
९ वाजून गेलेले असतात..
अन् ऑफिसची घाई असते …
अजब हे भाग्याचे नाते…
सकाळी सकाळी…चंद्राचं दर्शन होते …
मन कसं …प्रसन्न ..होउन जाते …
बाईकची किक मारतांना… हि
मग मरसडीज ची फिलिंग येते ….
गर्मीच्या मोसम मध्ये ही 
अचानक हवा ही थंड होते …..
मग उगाच एक हॉर्न वाजऊन 
गाडी ऑफीसच्या दिशेने निघते..
प्रत्येक सिग्नल वर…
ट्रॅफिक पोलिस ..तीच दिसते…
कधी ती मला थांबा म्हणते 
कधी …जा म्हणते…
तिच्या शिट्टीच्या आवाजात 
जणू काही ती कोड्यात बोलुन जाते …
पुन्हा उशिरा संध्याकाळी तीच
वेळ पून्हा होते ….
ती खिडकीत असते …
आमची स्वारी जेंव्हा ऑफिस  मधून येते…
या वेळेस मात्र 
आकाशात दोन चंद्राचं दर्शन होते….
आकाशात दोन चंद्राचं दर्शन होते…….
अभय शेजवळ
७-१०-२०२३

 free marathi prem kavita  |  download marathi prem kavita | aathavanitli marathi prem kavita  | 


Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by shejwalabhay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’

बायकोवरील कविता प्रेमातील भांडण | Husband and Wife Relationship | Marathi Kavita wife | Marathi Prem Kavita