in

लेट्स ब्रेक द रुबिक्स कोड !!

         

लेट्स ब्रेक रुबिक्स कोड !!

   रुबिक्स क्यूब म्हणजे एक अफलातून 3D पझल. हा रंगीबेरंगी ठोकळा पाहताक्षणीच पाहणाऱ्याची उत्सुकता चाळवते तो क्यूब हातात घेऊन क्यूबच्या बाजु फिरवून बघितल्याशिवाय त्याची उत्सुकता शमत नाही . हंगेरीच्या अर्नो रुबिक्स नावाच्या हंगेरीयन आर्कीटेक्टचं हे ब्रेन चाईल्डअकॅडमी ऑफ अप्लाईड आर्ट्स अॅन्ड क्राफ्ट मध्ये प्रोफेसर म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्याना स्थापत्य शास्त्रातल्या त्रिमितीय संरचना समजावुन घेणे सोपे जावे म्हणून या क्यूबची रचना केली . क्यूब तयार केल्यानंतर पहिल्यांदा स्क्रॅम्ब्ल करेपर्यंत त्याला स्वतःला देखील कल्पना नव्हती कि त्याने एका अनोख्या पझलची निर्मिती केलीय. त्याच्या या नव्या शोधाचीगेमिंग व्हॅल्यूलक्षात आल्यावर त्याने हंगेरी मध्ये या नव्या खेळण्याचं पेटंट रजिस्टर करवून घेतलं . आपल्या या जादुई खेळण्याचं नावही अर्नो नेजादुई ठोकळाम्हणजेमॅजीक क्यूबअसंच ठेवलं. सन १९८० पर्यंत हेच नाव प्रचलित होतं पण पेटंट रजिस्टर झाल्यावर क्यूबचा निर्माता म्हणून अर्नो रुबिक्सच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून तसेच व्यापाराच्या सोयीसाठीही एक ट्रेडमार्क म्हणून याचं नाविन बारसं करण्यात आलं, त्यामुळे सन १९८० पासून हा क्यूबरुबिक्स क्यूबम्हणून ओळखला जाऊ लागला . हा खेळ बाजारात आल्यावर लवकरच लोकप्रिय झाला पण याला खरी लोकप्रियता लाभली ती अमेरिकन खेळणी बाजारातील प्रवेशानंतरच तीही ८० च्या दशकातच . आजमितीला जगातलं सर्वात जास्त लोकप्रिय खेळणं  हा बहुमान रुबिक्स क्यूबच्याच नावावर आहे . ह्या खेळाची जगभरातील लोकप्रियता वाढतेच आहे . दरवर्षी जगात वर्ल्ड रुबिक्स क्यूब चॅम्पियनशिप आयोजित केली जाते . यावर्षीची स्पर्धा साओ पावलो येथे पार पडली . क्यूब जुळवण्याची सर्वोत्तम वेळ सेकंद  इतकी नोंदवली गेली !!  हा पराक्रम केला ऑस्टेृलियाच्या फेलिक्स झेम्देग्स या तरुणाने . एवढ्या कमी वेळात हा क्यूब सोडवणं म्हणजे कायच्या कायच . कारण हा क्यूब सोडवणे म्हणजे नॉट एवरीबडीस कप ऑफ टी . सहा बाजूंचे रंग एकदा फिस्कटल्यावर ते परत जुळवणे कर्मकठिण आणि एवढ्या कमी वेळात ते जुळवणे म्हणजे लईच सॉलीड काम आहे . हॉलीवूड आणि बॉलीवूड मधेही या क्यूबची फॅन मंडळी आहेत . आपला आमीर खान थ्री इडीयट्सच्या प्रमोशनच्या वेळी हा क्यूब बाळगत होता . हॉलीवूड मध्ये विल स्मिथलाही या क्यूब ची भुरळ पडली होती. बऱ्याच पाश्चिमात्य टेलीविजन सेरीज मध्ये एखाद्या बुद्धिमान पात्राच्या हातात हा ठोकळा हमखास दिसतो . कुशाग्र बुद्धिमत्तेचं प्रतिक म्हणून हा क्यूब कधीच मान्यता पावलाय .

हा खेळ प्रॅक्टीस करण्याचे फायदेही खूप आहेत . हा खेळ खेळताना मेंदूचा कस लागतो .  तज्ञाच्या मतानुसार हा खेळ मेंदूच्या डाव्या उजव्या भागामध्ये समन्वय साधण्यास मदत करतोत्यामुळे तार्किक विचार (लॉजिकल रिजनिंग) आणि नव निर्मिती या गुणांचा विकास होतो . क्यूब सोडवताना हँड आय को ऑर्डीनेशन एकदम मस्ट . त्यामुळे हँड आय कोऑर्डीनेशन सुधारण्यास मदत होते .प्रॉब्लेम सोल्व्हिंग स्किल्स , स्मरणशक्ती , संयम आणि चिकाटी या गुणांचा विकास होतोवयाची कोणतीही लिमिट नाही . कोणीही हा ठोकळा हातात घ्यावा आपला हात साफ करावा असा हा माइंड ब्लोईंग ख्योळ हाय . आणि यंगस्टर्स ना तर सध्याच्या सो कॉल्ड सोशल बिझिनेस मध्ये थोडासा ब्रेक म्हणून याकडे पाहायला काहीच हरकत नाही , तसेच स्कूल गोइंग टीन एजर्स ना मोबाईल तसेच व्हिडिओ गेम पासुन दूर ठेवण्यासाठी पेरेंट्सणी ह्या पर्यायाचा वापर करायला हरकत नाही . सिनियर सिटीजन्सनी देखील एक उत्तम ब्रेन एक्सरसाइज किंवा एक चांगला टाइमपास म्हणून ट्राय करून पाहावा .

             
अशा या रुबिक्स क्यूबशी माझा संबंध एक वर्षापूर्वी आला .  पझल सोल्व करण्याच्या वेडाने  ताबा घेतला . युट्युब , विकी , गुगल सगळीकडे धुंडाळूण याचे अल्गोरीदम्स मिळवले आणि शेवटी याला सोडवलाच. सोडवताना खूप मजा आली आणि सोडवल्यानंतरचा आनंद लैच भारी . एक गोष्ट लक्षात आली कि मराठीतून ह्याविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे . सारे अल्गोरीद्म्स, विडीओज इंग्रजी मध्ये आहेत . सारे अल्गोरिदम माहित झाले कि ते १० दिवसात हा क्यूब जुळवता येऊ शकतो . हे अल्गोरीद्म्स आपल्या ब्लोग वर का शेअर करू नये असा विचार मनात आला आणि हि पोस्ट लिहायला घेतली . हे अल्गोरीद्म्स टप्प्या टप्प्याने जसा वेळ मिळेल तास शेअर करूण याची एक सेरीज करावी असा विचार आहे . जेणेकरून इतर लोकांना हि यातील गम्मत कळावी . तसेच इंजिनीरिंग स्टुडंट्स माझ्याकडे शिकण्यासाठी येत असतात (थोडीशी वरकमाई !!) . त्यांनाही नोट्स म्हणुन हे अल्गोरीद्म्स वापरता येतील . तसेच अधिकाधिक मराठी नेटकरांपर्यंत देखील हे अल्गोरीद्म्स पोहोचतील .

धन्यवाद !!


Read More 

What do you think?

41 Points
Upvote Downvote

Written by Pramod

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

मिर्झापूर – रक्तलांच्छित सूडनाट्य

Buy Marathi Books Online From MarathiBoli.com