हेच ते छायाचित्र ज्याच्या आधारे खोटी द्वेषमूलक माहिती पसरवली जात आहे.
सोबतच्या छायाचित्राचा वापर अत्यंत बेमालूमपणे द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याने त्यातले सत्य समोर आणण्यासाठीची ही ब्लॉगपोस्ट!
याची सत्यता जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. हे छायाचित्र ज्यांनी काढले आहे ते किशोर पारेख हे भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भावनगरचा. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी चित्रपट निर्मिती आणि माहितीपट छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेलं. विद्यार्थीदशेत केलेल्या प्रोजेक्टमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1960 ला ते भारतात परतले आणि हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार बनले. तिथं काम करताना त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले. युद्धाच्या समाप्तीच्या वेळी झालेल्या ताश्कंद शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी त्यांना तत्कालीन सोव्हिएत लँडने सुवर्णपदक प्रदान केले. त्यांनी 1966 – 1967 च्या बिहारमधील दुष्काळाचे टोकदार कव्हरेज केले. या विषयावरील त्यांच्या छायाचित्रांचे अमेरिकेत प्रदर्शन भरवण्यात आलेलं.
हिंदुस्तान टाईम्समध्ये सहा वर्षे काम केल्यानंतर, पारेख 1967 पुस्तकाचे मुखपृष्ठ मध्ये हाँगकाँगमधील आशिया मासिकात रुजू झाले. त्यांनी आशिया पॅसिफिक प्रदेशात असाइनमेंट इनचार्ज म्हणून प्रवास केला. नंतर, ते पॅसिफिक मॅगझिन्स लिमिटेडचे फोटो एडिटर बनले, हे पद त्यांनी सुमारे 1972 पर्यंत भूषवले. त्यानंतर, ते मुंबईला परतले.
पारेख हे 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धावरील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. या विषयावरील त्यांचे पुस्तक, ‘बांगलादेश: अ ब्रुटल बर्थ’, हे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांवर आणि मूळ बंगाली लोकसंख्येच्या दुःखावर आधारित होते. छायाचित्रकार पाब्लो बार्थोलोम्यू यांच्या मते: “बांगलादेश हा किशोर पारेख यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. त्यांनी स्वतःहून, स्वेच्छेने मानवतेच्या भावनांनी आणि धाडसाने प्रेरित होऊन, दोन आठवड्यांच्या कालावधीत त्यांनी थक्क करणाऱ्या फोटोंचा एक संच तयार केला. ज्याचे रूपांतर एका शक्तिशाली पुस्तकात आणि भाष्यात झाले!” युद्धाच्या परिणामां विषयक संवेदना वाढवण्यासाठी भारत सरकारने पुस्तकाच्या या 20000 प्रती प्रकाशित केल्या. पारेख यांचे काम आणि त्यांचे समर्पण या माहितीवरून लक्षात यावे! त्या पुस्तकातील पान नंबर 22 वर हे छायाचित्र आहे! त्याचे स्क्रीनशॉट्स सोबत जोडले आहेत.
असे असूनही काही ट्रोल मंडळी आणि काही व्हॉट्सअॅप पुस्तकाची अर्पणपत्रिका युनिव्हर्सिटीचे आज्ञाधारक विद्यार्थी तसेच आयटीसेलचे फॉलोअर्स या फोटोला वेगळ्याच कॅप्शनखाली फॉरवर्ड करताहेत. ‘पाकिस्तानी सैनिक भारतीयांची लुंगी तपासून हत्या करतानाचे विदारक दृश्य’ अशा अर्थाचे खोटे मेसेज पसरवले जाताहेत. त्याच्या जोडीने, ‘आता तरी जागे व्हा आणि त्यांचं अमकं करा, तमकं करा, त्यांना अमुक करा तमुक करा..’ असं बरंच काही त्यासोबत जोडून लिहिलेलं होतं!
वास्तवात या फोटोमध्ये, भारतीय सैनिक, संशयित बांगलादेशी नागरिक गुप्तहेर आहे की काय जाणून घेण्यासाठी त्याची लुंगी तपासून त्या लुंगीत शस्त्रे लपवली आहेत का याचा शोध घेत होते, ते दृश्य कैद झालेय! आणि आपल्याकडची ट्रोल मंडळी सांगताहेत की, पाकिस्तानी सैनिक भारतीय पुरुषांची खतना (खरे तर सुंता!) झाली आहे की नाही ते तपासत असत, आणि गैरमुस्लिम असेल तर त्याला जिवंत सोडत नसत! बेहद्द खालची पातळी गाठलेल्या व्यक्तीच असलं भयंकर असत्य पसरवू शकतात!
आपल्या भारतीय आणि तेही गुजराती व्यक्तीने हे फोटो शूट करून त्यासोबत कॅप्शन दिल्याने हे सत्य तरी समोर आले नाहीतर अनेक खोट्या फॉरवर्ड प्रमाणे हेही फेक नरेटीव्ह खपून गेले असते! असो!
भारतीय हवाई दलातील दिवंगत फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत पान नंबर बावीसवरील छायाचित्र.. गाडगीळ यांच्या आई कविता गाडगीळ यांनी नुकतेच जे मत मांडलेय त्याला पुष्टी देणारा अत्यंत ऐतिहासिक ऐवज आणि फोटो या पुस्तकांत आहेत. काही मजकूर वाचवत नाही आणि काही फोटो पाहवत नाहीत. एका गोष्टीचे खेदयुक्त नवल वाटते; आपल्याच देशाने पाकड्यांना अद्दल घडवण्यासाठी करवलेलं युद्ध, त्यात आपलेच सैनिक आणि आपलाच फोटोग्राफर नि त्यावरचे आपल्याच देशातले पुस्तक! आणि त्या पुस्तकातला फोटो वापरुन, तो सैनिक पाकिस्तानी आहे असे सांगून त्याच्या नावाने धर्मद्वेषाची धुरी सामान्य नागरिकांना द्यायची! म्हणजे किती पाताळयंत्री लोक असतील हे, चांगल्या संदर्भांची वासलात लावताना आपण नकळत आपल्याच एका सैनिकाची बदनामी करत आहोत हे तर त्यांच्या गावीही नसेल! शेमलेस!
आपल्या नेत्याची, आपल्या पक्षाची, आपल्या विचारधारांची भलामण करण्यासाठी रोज उठून कुणाला तरी शिव्या घालायच्या, कुणाच्या न कुणाच्या वॉल हुंगत फिरायचं, आईबहिण न पाहता शिव्यांची लाखोली वाहायची, विरोधातला विचार दिसला की सदविवेकबुद्धी न वापरता तुटून पडायचं आणि जोडीने आपल्या जवळचं खोटं बेमालूमपणे पसरवत राहायचं हे काम जगातल्या सर्वात लाजिरवाण्या, नीच आणि वाईट वृत्तीचे दार्शनिक ठरावे! असो. सर्वांचाच विवेक कधी न कधी जागा होवो!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings