प्राण प्रतिष्ठापना आणी सिझेरियन काल २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची
अयोध्येत नवीन मंदिरात प्राण- प्रतिष्ठापना झाली. संपूर्ण भारतखंडात दिपावली साजरी
झाली. या नेत्रदीपक सोहळ्याच्या निमित्याने देशातील काना-कोपर्यात साजरा झालेल्या
उत्सवाच्या बातम्या बघताना एका बातमीने लक्ष वेधले आणि हसू आवरले नाही. ज्या
स्त्रियांची डिलेव्हरी जवळ आली होती अशा अनेकांनी ( जोडप्यांनी) २२ तारखेला
सिझेरियन करून बाळाला जन्म द्यायची इच्छा व्यक्त केली होती.
हे एकून काहीशी अशी प्रतिक्रिया आपसूक आली. 🤦🏻♂️ २२ जानेवारीचा काढिव मुहूर्त हा
प्रभू श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा होता. आपल्या पोटी श्रीरामा
सारखे बाळ जन्माला यावे ही इच्छा होणे साहजिक आहे. पण नियतिची ही काही योजना असते.
त्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही. नैसर्गिक प्रसूती किंवा डाँक्टरांनी २२ तारखेला
सिझरींग करु असे सांगितले असेल ( ही पण नियतीचीच योजना) तर गोष्ट वेगळी. पण तसे
काही नसताना भावनेपोटी सिझेरियन करायचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांना शुभेच्छा आणि
सर्व नवजात बालकांना प्रेमळ आशीर्वाद 💐 ज्योतिष अभ्यासकांसाठी:- २२ जाने २०२४
,दुपारी १२:३२ ची मेष लग्नाची पत्रिका. राशीस्वामी शुक्र जो द्वितीयेश आणि सप्तमेश
( मारकेश) आहे तो धनू ( शत्रू राशीत) मुळ नक्षत्रात आहे. चंद्रापासून आठवा आहे. आज
पासून २५ -३० वर्षांनी या बालकांच्या विवाहासंबंधीचे प्रश्ण येणार आहेत. तुमच्याकडे
ही अशी एखादी पत्रिका येईलच. त्यावेळी या ग्रहस्थितीचा सप्तम स्थानाच्या दृष्टीने
अवश्य विचार करावा षष्ठेश – अष्टमेश युतीत भाग्य स्थानी इतर ग्रहयोग चंद्र-शुक्र
प्रतियोग, चंद्र – नेपच्यून केंद्र योग अर्थात लग्न बदलले, भाव बदलले की परिणाम
बदलतील. काही चांगले योग पत्रिकेत, नवमांश कुंडलीत आहेत. आपणासही काही विशेष योग
आढळल्यास अवश्य सांगा श्रीराम 🙏 ( ज्योतिष अभ्यासक) अमोल केळकर 📝 पौष. शु.
त्रयोदशी २३/०१/२०२४
Loading…
GIPHY App Key not set. Please check settings