वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्तेक घटकाला माहीत असतं, रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो.
in Travel
GIPHY App Key not set. Please check settings