दुआ केव्हा, कुणाची स्वीकृत होते ? नियम व शिष्टाचार
इस्लाम धर्मामध्धे वेळेबद्दल काही संकेत देण्यात आले आहेत. त्या वेळी मागितलेली दुआ त्वरीत स्वीकृत होते अशी मुस्लिम बांधवाची धारणा आहे. प्रत्येक रात्रीच्या सुरूवातीला, मध्यरात्री आणि उत्तररात्री म्हणजे रात्रीच्या अंतिम प्रहरी व पहाटेच्या वेळी. मस्जिदमधून अजान झाल्यावर आणि अकामत म्हणजे नमाजकरीता उभे राहण्याच्या दरम्यान, सज्दा करताना म्हणजे जमिनीवर नाक आणि डोके टेकले असताना, प्रत्येक नमाजनंतर, जेव्हा शत्रूवर हल्ला करण्याकरिता फौजा सज्ज होती, ऐन लढाईच्या दरम्यान, शुक्रवारच्या दिवशी, नऊ जिल्हेज म्हणजे हज्जच्या आदल्या दिवशी, पहाटे जेव्हा कोंबडा बांग देतो किंवा हल्ली गजर होतो, मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला पहावयास चालताना, पाऊस पडतेवेळी, कुरआन पठण झाल्यानंतर, रमजानचा संपूर्ण महिना, ईदुल फित्र (रमजान ईद) आणि इदुलअज्हा (बकरी ईद) , शुक्रवारची रात्री म्हणजे गुरूवार व शुक्रवारची मधली रात्र, कअबागृहावर नजर पडताक्षणी, जमजमचे पाणी पीत असताना ही जमजमची विहीर, क अबागृहाच्या पीरसरात, कअबागृहापासून अवघ्या पंधरा फुटाच्या अंतरावर आहे, तसेच कअबागृहाची प्रदक्षिणा म्हणजे तवाफ करतेवेळी, मुल्तजिम आणि मकामे ईब्राहिमच्या निकट मुल्तजिम हजरेअस्वद (कअबाशरीरफच्या भिंतीत एका कोपऱ्यात रोवलेला काळा दगड) आणि कअबा शरीफच्या दरवाजाच्या मधली अत्यंत पवित्र जागा मुल्तजिम म्हणून ओळखली जाते. तसेच कअबागृहापासून काही फुटाच्या अंतरावर सुरक्षीत करून ठेवण्यात आलेली शीला ज्यावर उभे राहून हजरत ईब्राहिम कअबा गृहाची बांधरी करीत होते ही दोन्ही ठिकाणे दुआच्या स्वीकृतीची उच्च ठिकाणे आहेत, अरफात, मिना आणि मुज्दल्फा या मैदानातील संपूर्ण परिसर दुआच्या स्वीकृतीची उत्तम ठिकाणे आहेत. ज्यांची दुआ कबूल होते त्या व्यक्ती पुढीलप्रमाणे, संकटात सापडलेल्या व्यक्तीची, अत्याचार पिढीताची मग तो गुन्हेगार का असेना किंवा तो अश्रध्दावंत म्हणजे काफिर का असेना, वाटसरूची प्रार्थना, आपल्या संतानाकरीता आई वडिलांनी मागितलेली दुआ, हजयात्रेला गेलेल्या हाजीची दुआ जोपर्यंत तो आपल्या घरी पोचत नाही, रोजा सोडतेवेळी म्हणजे रोजा इफ्तारच्या आधी, दुआ म्हणजे अल्लाहकडे एकचित्त होऊन अत्यंत नम्रपणे आपल्या मागण्या मांडण्याची व सादर करण्याची एक उपासना होय.
प्रेषितसाहेब आणि त्यांचे आदर्श खलिफा व सोबतियांच्या जीवन चरित्रावरून दुआ मागण्याचा वारसा सर्व मानवजातीपर्यंत पोहचला आहे. त्याच अनुभवाचे पैलू मांडत आहे, दुआ अल्लाहचरणी स्वीकृतीसाठी सर्वप्रथम खाण्यात-पिण्यात आणि इतर कमाईमध्ये हलाल मालाची व्यवस्था करणे आवश्यक आहे, दुआ मागताना दिखावटीपणा, अवडंबर आणि ढोंगबाजी न करता अत्यंत सच्चा मनापासून व खरा कळवळा राखून ही उपासना करावी आणि असेही ध्यानीमनी असले पाहिजे की अल्लाहशिवाय इतर कुणीही माझ्या या कार्याला पूर्ण करू शकणार नाही., स्वच्छ व पवित्र आणि शुचिर्भूत होऊन म्हणजे वुजू करून बसावे, किब्ल्याकडे म्हणजेच कअबागृहाचे दिशेने तोंड करावे, दोजानू, नमाजमध्ये गुडघे टेकून बसतात तसे बसावे, प्रार्थना सुरू करायच्या आधी अल्लाहची खूप प्रशंसा म्हणजे हम्दो सना करावी., नंतर पैगंबर साहेबांवर दुरूद पढावे, नंतर हातांना खांद्यापर्यंत उचलावे व दोन्ही हात जोडून तळहात पूर्णपणे उघडे करावेत., दुआ मागतेवेळी अत्यंत अजीजीने बसावे दुआच्या दरम्यान आपल्या अजीजीचा उल्लेख करावा. दुआ करतेवेळी आकाशाकडे पाहू नये., अल्लाहची अनेक शुभनामे आहेत जसे गफूर, रहीम, करीम, अल्मुईज्ज, अल-राफेय, अल्बासित इ. यांची एकूण संख्या ९९ आहे. या ईश्वरी नावांच्या आपल्या दुआमध्ये उल्लेख करावा., दुआ मागताना शक्यतो यमकबध्द व काव्यरूपी भाषेचा वापर करू नये. ज्यापुढे आपण हातं पसरविले आहेत तो सर्वज्ञ आणि जगातील तमाम भाषांचा निर्माता आहे. तो तुमच्या शब्दांच्या पलीकडील आशयांचा जाणणारा आहे., दुआ हळुवारपणे म्हणजे खालील स्वरात मागावी. पैगंबर साहेबांनी वापरलेल्या शब्दांचा वापर करावा., दुआ मागताना प्रधानतेचे भान राखावे म्हणजे प्रथम स्वतःकरिता नंतर आपल्या आई-वडिलांकरीता, नंतर आपल्या मुलांबाळांकरिता नंतर निकटवर्ती व नातेवाईकांकरिता व्र जगातील सर्व बांधवाकरिता मागावी., साश्रू नयनांनी दुआ मागावी, पाणावलेले डोळे अल्लाहना पसंत आहेत., दुआ ताबडतोब कबूल व्हावी याकरिता आग्रह धरू नये., आपली दुआ संपल्यावर अमीन म्हणजे अल्लाह माझ्या मागण्या मान्य करोत म्हणावे, दुआचा शेवट दरूद शरीफने करावा, दुआ संपल्यावर आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवावेत. अशाप्रकारे दुआ मागून मागण्या पूर्ण करून घ्याव्यात.


GIPHY App Key not set. Please check settings