जेनोसाईड-वंशसंहारासाठी नरसंहार.
आधी जेनोसाईडचा अर्थ शब्दकोशात काय लिहिलाय ते पाहूया..
genocide. noun. geno•cide ˈje-nə-ˌsīd. : acts committed with intent to partially or wholly destroy a national, ethnic, racial, or religious group. also : the crime of committing such an act.
युनोच्या यासाठी बोलवलेल्या खास अधिवेशनाच्या अनुच्छेद २ मध्ये नरसंहाराची व्याख्या अशी केली आहे:
… खालीलपैकी कोणतीही कृत्ये राष्ट्रीय, वांशिक, वांशिक किंवा धार्मिक गटाला, संपूर्णपणे किंवा अंशतः नष्ट करण्याच्या उद्देशाने केली आहेत , जसे की :
१ गटातील सदस्यांना मारणे;
२ गटातील सदस्यांना गंभीर शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणे;
३ संपूर्ण किंवा अंशतः भौतिक विनाश घडवून आणण्यासाठी गणना केलेल्या जीवनाच्या समूह परिस्थितीवर जाणीवपूर्वक लादणे;
४ समूहातील जन्म रोखण्याच्या उद्देशाने उपाययोजना लागू करणे;
५ गटातील मुलांना जबरदस्तीने दुसऱ्या गटात स्थानांतरित करणे.
नरसंहाराच्या गुन्ह्याच्या प्रतिबंध आणि शिक्षेचे अधिवेशन, अनुच्छेद २
कलम 3 अधिवेशनांतर्गत शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह्यांची व्याख्या करते:
(१) वंशसंहारासाठी नरसंहार
(२) वंशसंहारासाठी नरसंहार करण्याचा कट
(३) वंशसंहारासाठी नरसंहार करण्यासाठी थेट आणि सार्वजनिक चिथावणी ;
(४) नरसंहार करण्याचा प्रयत्न
(५) नरसंहारातील सहभाग .
ही व्याख्या अर्थातच इस्लामला मान्य नाही. कारण ही व्याख्या जर मान्य केली तर इस्लामच मोडीत काढावा लागेल किंवा त्यात प्रचंड बदल करावा लागेल.
भारताच्या बाबतीत विचार केला तर इस्लामने ९०० सालापासून ते १९५० सालापर्यंत हिंदूंचा वंशसंहार करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. मागच्या माझ्या एका लेखात बंगालमध्ये ज्या दंगली घडवून आणल्या गेल्या त्यात बंगालमध्ये वंशसंहाराच्या योजनेशिवाय दुसरे काहीही नव्हते, त्या लेखाची लिन्क खाली दिली आहे. इस्लामच्या इतिहासकारांनी जी हिंदूंची हत्याकांडे या काळात झाली, फक्त त्याचाच हिशेब जर केलात तर तुम्हाला चक्कर येईल.
या व्याख्येनुसार, काश्मिरमध्ये जे काही झाले ते वंशसंहाराशिवाय दुसरे काही नव्हते, कारण त्याला दंगल म्हणता येत नाही. तामिळनाडूमध्ये मारनसाहेब भाषणात म्हणाले सनातन धर्मियांचा (हिंदूंचा) करोनासारखा नायनाट करावा. ही चिथावणीखोर भाषा नाहीतर काय आहे?
सध्या आपण इस्राएलच्या नावाने नरसंहाराचा कंठशोष चाललेला पाहतो आहे, त्यात एक गंमत आहे. इस्लाम धर्माच्या एका गटाने इस्लामच्या दुसऱ्या गटाचा नायनाट केला तर तो नरसंहार होत नाही. अरबांनी अरबांना ठार मारले तर तो वंशसंहार होत नाही, पण इस्राएलच्या सैन्याने पॅलेस्टाईनच्या जिहादींना मारले तर इस्राएलवर वंशविच्छेदाचा आरोप केला जातो. सिरियाच्या वर्गकलहात, जो अनेक वर्षे चालला होता, त्यात असादच्या राजवटीने हजारो अरब मारले, अगदी गॅसने मारले, पण त्यासाठी ना युरोपमध्ये निदर्शने झाली ना अमेरिकेत. यात असंख्य पॅलेस्टाईन नागरिकही मारले गेले होते हे विशेष. तेव्हा ‘‘फ्री सिरिया, सिरिया विल बी फ्री अशी निदर्शने झाल्यावे ऐकिवात नाही, कारण येथे इस्लाम धर्मियांनी इस्लाम धर्मियांना मारले होते. (येथे ४००० पॅलेस्टाईन माणसे मारली गेली होती) युनोच्या एका अहवालात, त्या काळात सिरियाच्या वर्गयुद्धात ४३८०००च्या ९५ टक्के जनतेला जगण्यासाठी मदत आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले होते, पण तेव्हाही निदर्शने झाली नाहीत., कारण एकच, मरणारे मुस्लीम होते आणि मारणारेही मुस्लीम होते. या विरुद्ध अमेरिकेत आणि युरोपातील कुठल्या विद्यापीठात निदर्शने झालेली ऐकिवात नाहीत. आजही सिरिया अरबांची कत्तल करतच आहे, पण त्याकडे जग दुर्लक्ष करत आहे, कारण जगाचा कारभार समाजवादी विचारांनी सध्या चालत आहे. (सुसंस्कृत मार्क्सिझम)
अजून एक उदाहरण देतो. यात आपला शेजारी देशाचा सहभाग आहे, जो इस्लामचा कट्टर पाठिराखा आहे. जिहाद हा त्याचा प्राण आहे.
ही १९६७ सालातील गोष्ट आहे. जॉर्डनच्या लष्कराची सहा दिवस जे युद्ध
इस्राएलबरोबर चालले त्यात पार वाट लागली होती. या युद्धात जॉर्डन इजिप्तच्या बाजूने युद्धात उतरला होता. या युद्धात पराभव झाल्यानुळे ‘‘वेस्ट बँक’’ आणि पूर्व जेरुसेलेमवर इस्राएलचा कबजा झाला. जवळ जवळ ३००००० पॅलेस्टाईन जनतेने जॉर्डन नदी पार करून जॉर्डनक्मध्ये आसरा घेतला. त्यांची सगळ्यात सगळ्यात मोठी निर्वासित छावणी अम्मान शहराजवळ उभारली गेली होती. या सगळ्यामुळे जॉर्डनची आर्थिक परिस्थिती पार ढासळली होती. जॉर्डनच्या या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेऊन पॅलेस्टाईन बंडखोरांनी उचल खाल्ली. जॉर्डनमध्ये त्यांनी स्वतःचे एक राज्य स्थापन केले असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी जॉर्डनच्या राजावर अनेक फियादीन हल्ले केले. या फियादीन मंडळींना जॉर्डनची सत्ता झुगारून स्वतःची सत्ता स्थापन करायची होती. जॉर्डनला अमेरिका आणि ब्रिटन लष्करी मदत करत होते, पण जॉर्डनचा राजा हुसेन याला परिस्थिती काबूत आणण्यासाठी कोणीतरी लष्करातील माणूस हवा होता. त्यावेळी सिरिया आणि इराकची या बंडखोरांना मदत होतीच.
राजा हुसेन याने स्वतःच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानमधून लष्करी तज्ञ बोलावले. या तज्ञांमध्ये होता ब्रिगेडियर झिया उल हक्क. झिया तेथे तीन वर्षे राहिला. जॉर्डनच्या सैनिकांना त्याने प्रशिक्षित तर केलेच पण ‘‘ब्लॅक सप्टेंबर’’ नावाच्या मोहिमेचे आधिपत्यही केले. १९६९ मध्ये परिस्थिती अजूनच चिघळली. इराकमध्ये आणि सिरियामध्ये बाथ पार्टीच्या हातात सगळी सूत्रे गेली होती. मे १९७० मध्ये इराकने यासर अराफतला (पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचा सर्वेसर्वा) असे सांगितले, की जर त्यांनी हुसेनला पदच्युत केले तर त्यासाठी लागणारी सर्व मदत ते देतील. पॉप्युलर फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन (PFLP) आणि डेमॉक्रेटिक फ्रंट या दोन अतिरेकी संघटना आधीपासूनच हुसेनच्या जिवावर उठल्या होत्या. शिवाय इराणच्या कम्युनिस्ट संघटना पॅलेस्टाईन बंडखोरांना मदत करत होत्या.
इराकी सैन्याचे २०००० सैनिक आणि २०० रणगाडे जॉर्डनमध्ये तळ ठोकून होते, आणि त्यांचे मोठे सैन्य जॉर्डनमध्ये घुसण्याच्या तयारीत होते. शिवाय जॉर्डनपेक्षा सुस्थितीत असलेले विमानदलही त्यांच्या सहाय्यास होते. जॉर्डनकडे ६५००० सैन्य होते, पण दुर्दैवाने त्यातील बहुतेकांची निष्ठा संशयास्पद होती. पॅलेस्टाईन बंडखोरांची संख्या अंदाजे १५ ते २० हजार असावी आणि ते सगळे शहरातून विखुरले होते.
१ सप्टेंबरला हुसेनच्या हत्येचा प्रयत्न झाला त्यात PFLP चा हात होता. यात जी छोटीशी लढाई झाली त्यात इराकने पॅलेस्टाईन बंडखोरांना सशस्त्र पाठिंबा जाहीर केला. PFLP ने याच काळात चार प्रवासी विमाने पळवली आणि वार्ताहरांसमोर बाँब लावून उडवली. १५ सप्टेंबरला पॅलेस्टाईन बंडखोरांनी जॉर्डनमधील इर्बीड शहरावर ताबा मिळवला. त्याच क्षणी राजा हुसेन यांनी ठरवले की झाले तेवढे बास झाले. १६ सप्टेंबरला त्याने मार्शल लॉ लादला आणि १६ सप्टेंबरला बंडखोरांचा समाचार घेण्यासाठी आक्रमण केले.
जॉर्डनच्या या ह्ल्ल्यात रणगाड्यांचा वापर करण्यात आल्यामुळे पॅलेस्टाईन बंडखोरांना माघार घ्यावी लागली. या चकमकींमध्ये रस्त्या रस्त्यांवर हातघाईचे युद्ध लढण्यात आले. अखेरीस जॉर्डनच्या सैन्याला पॅलेस्टाईन बंडखोरांना अलग करण्यात यश आले. त्याच वेळी जोर्डनच्या सैन्याने इराकच्या सरकारमध्ये एक बातमी मोठ्या खुबीने पेरली, की अमेरिका त्या भागात प्रचंड सैन्य तैनात करणार आहे. इराकने या खोट्या अहवालावर विश्र्वास ठेवला आणि त्यांनी या लढाईतून अंग काढून घेतले.
१८ सप्टेंबरला सिरियन रणगाड्यांनी जॉर्डनमध्ये प्रवेश केला आणि राजा हुसेन याने झिया ऊल हक्कला जमिनीवर काय परिस्थिती आहे हे पाहण्यास पाठवले. झियाचा या हत्याकांडामध्ये असा प्रवेश झाला.
झियाने अहवाल सादर केला त्यात त्याने लिहिले, की परिस्थिती गंभीर आहे, पण हाताबाहेर गेलेली नाही. जॉर्डन सिरियाच्या रणगाड्यांचा समाचार करू शकतो. असे म्हणून झियाने जॉर्डनच्या सैन्याचे आधिपत्य स्वीकारले.
सिरियन संरक्षण मंत्र्यांनी (जो सिरियाच्या विमानदलाचा प्रमुखही होता) त्याने या युद्धात भाग घ्यायचा नाही असा निर्णय घेतला.
२२ सप्टेंबरला जॉर्डनचे वर्चस्व परत एकदा प्रस्थापित झाले. यानंतर आपल्या मित्राला मदत करण्यासाठी इजिप्त पुढे सरसावला. इजिप्तचा अध्यक्ष नासर याने हुसेन आणि यासर अराफत यांच्यामध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यात पुढाकार घेतला (२६ सप्टेंबर). दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी नासरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अशा रितीने जॉर्डनमधून पॅलेस्टाईन बंडखोरांची जॉर्डनमधून हकालपट्टी करण्यात आली. या बंडखोरांनी आपला तथाकथित लढा लेबनॉनमधून सुरू ठेवला. या चकमकींमध्ये ४००० पॅलेस्टाईन बंडखोर, ६०० सिरियन सैनिक आणि ५३७ जॉर्डनचे सैनिक मारले गेले. यात असे म्हणतात २० ते २५ हजार पॅलेस्टाईन सामान्य नागरिक ठार झाले. (एवढे पॅलेस्टाईन नागरिक पुढच्या २० वर्षात इस्राएलनेही मारले नाहीत)याला झिया ऊल हक्क या पाकिस्तानी ब्रिगेडियरला जबाबदार धरण्यात आले. तो पॅलेस्टाई नागरिकांचा मारेकरी म्हणून ओळखला जाऊ लागला.
या हत्याकांडाला इतिहासात ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते.
आता तोच पाकिस्तान पॅलेस्टाईनच्या बाजूने लढाईची भाषा बोलत आहे. तेव्हा कुठेही या हत्याकांडाविरुद्ध मुसलमानांनी निदर्शने केली नाहीत. युरोप आणि अमेरिकेमध्ये तर नाहीच नाही. सगळ्या शैक्षणिक संस्थांमधून असलेल्या woke प्राध्यापकांचा आवाज यावेळी बंद होता. आता अमेरिकेत आणि जगात (भारतातही) सांस्कृतिक मार्क्सिझम कसे पसरले आहे हे आपल्याला खालील व्हिडिओमधून कळेलच. (woke मंडळी विद्यापीठातून कसे काम करतात हे आपल्याला या व्हिडिओमधून कळेल. – https://www.youtube.com/watch?v=31Eu-xEZKzQ&list=WL&index=45 ) कारण एकच, या येथेही मुसलमानांनी मुसलमानांना मारले होते.. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, की तेव्हापासून कुठल्याही इस्लामी राष्ट्रांनी पॅलेस्टाईन विस्थापितांना त्यांच्या राष्ट्रात आसरा दिलेला नाही. आसरा दिला तो प्रगत युरोपिय देशांनी आणि अमेरिकेने, पण त्यांच्या पदरी पडले ते अराजक आणि यांना पाठिंबा आहे कम्युनिस्टांचा. सध्या फ्री पॅलेस्टाईनच्या निदर्शनात जे लाल झेंडे दिसतात ते याचमुळे. पोलंडने मात्र हे संकट वेळीच ओळखून या मंडळींना प्रवेश नाकारला आणि स्वत्ःच्या देशाला अराजकापासून वाचवले.
यावरून आपण काय धडा घ्यायचा? मुसलमान निर्वासित हे तुमच्या राष्ट्राच्या संस्कृतीशी मिसळून जाऊ शकत नाहीत . (रोहिंग्या, बंगलादेशी, अफगाणी इ.इ.या लोकांवर विश्र्वास ठेवणे हे पाप आहे.) त्यांच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे त्यांची निष्ठा ही फक्त इस्लामशीच राहू शकते. (मारणारा आणि मरणारा दोन्ही पक्षाची) याचा अनुभव आपण बंगालमध्ये घेतच आहोत.. पॅलेस्टाईन जनतेवर आता इस्लाम राष्ट्रेही विश्र्वास ठेवत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे..
– जयंत कुलकर्णी
GIPHY App Key not set. Please check settings