in

क्रूसेडचा इतिहास

नवीन पुस्तक – क्रूसेडचा इतिहास.

हे नवीन पुस्तक आपल्या हाती देण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये सध्या जे काही चालले आहे त्याच्या पार्श्र्वभूमीवर हे पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

…तुर्कांनी १०७१ मध्ये जेरुसलेम काबीज केले. सुरुवातीला त्यांनी या यात्रांमध्ये फारशी ढवळाढवळ केली नाही, कारण त्यांना यात्रेकरूंकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडायचे नव्हते. शिवाय अतसिझ आणि आर्तुक हे दोन तुलनेने सभ्य राजे होते. फारसे धर्मवेडे नव्हते. दुर्दैवाने फातिमिड घराण्याच्या पाडावानंतर अनेक छोटी छोटी संस्थाने उदयास आली ज्यांच्यात करातील हिश्यासाठी चकमकी सुरू झाल्या. थोड्या थोड्या अंतरावर आता जकात नाकी दिसू लागली. तुर्कांमुळे ख्रिश्चन यात्रेकरूंवर मोठे संकट कोसळले. असंख्य धर्मगुरूंना हद्दपार करण्यात आले. गावेच्या गावे ओस पडली, पुल कोसळले, विहिरी आटल्या किंवा बुजवण्यात आल्या. याच वातावरणात फ्लँडर्सच्या रॉबर्ट – १ या काऊंटने १०८९ मध्ये जेरुसलेमची यात्रा केली, पण बहुतेक यात्रेकरूंचा अपमान करून तुर्कांनी त्यांना परत पाठवले.

जे हजारो यात्री एशियामधे जात होते, दुर्दैवाने त्यातील काहीच परत येत होते. पण ते येताना युरोपमधील प्रांतांतून येत आणि त्यांनी भोगलेल्या छळांच्या रक्तरंजित कहाण्या स्थानिकांना ऐकवत. पवित्र जेरूसलेमच्या कहाण्या ऐकायला त्यांना चांगला श्रोतृवर्ग मिळे व छळाच्या या कहाण्या युरोपमध्ये दूरदूरवर पसरत. त्यांचा खडतर प्रवास, त्यांच्यावर व जेरूसलेममधील त्यांच्या धर्मबांधवावर होणारे अत्याचार यांच्या कहाण्या अशा रितीने युरोपभर पसरल्या व तुर्कांविरुद्ध सूडाची आग धगधगू लागली. वर्षामागून वर्षे उलटली आणि ही आग भडकतच गेली. एक काळ असा आला की या आगीत काय जळणार हा प्रश्न उभा राहिला. या मुसलमानांचे काय करायचे हा प्रश्न विचारला जाऊ लागला. क्रुसेडने त्याचे उत्तर दिले…

काय उत्तर दिले हे कळण्यासाठी मी लिहिलेले ‘‘क्रूसेडचा इतिहास’’ हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. मला वाटते क्रूसेडवर मराठीतील हे पहिलेच पुस्तक असावे.. (खात्री नाही)

एक विनंती आहे. आपण आपल्या सर्व मित्र/मैत्रिणींना ही पोस्ट शेअर करावी.

किंमत खालीलप्रमाणे –

नाव : क्रूसेडचा इतिहास

किंमत रु. ४००

२० डिसेंबरनंतर पुस्तके पाठवण्यात येतील.

सवलत : २०% व घरपोच.

कृपया रु ३२१ + 00 पोस्टेज + १ = रु ३२१ एवढे पैसे मला जीपे करावेत.

कृपया ३२२ किंवा ३२० पाठवू नयेत. ३२१ आले म्हणजे ते क्रूसेडसाठी आले आहेत हे लगेच समजते म्हणून हा खटाटोप.

ज्यांनी पूर्वी कुठलेतरी पुस्तक घेतले असेल, तर त्यांचा पत्ता माझ्याकडे आहे, पण बदलला असेल तर जरूर परत पाठवावा. (किंवा परत पाठवला तरी चालेल.)

जीपेसाठी टेलीफोन क्रमांक : ९८२३२३०३९४

स्कॅनसाठी क्यूआर कोड खाली दिला आहे.

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

कार्ड रिडींग

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

गांधीयुग व गांधीयुगांत