खूप वर्षांनी जुनी चित्रिकरणं बघत होते आणि अचानक हे सापडलं. पर्णिकाच्या बारश्याला भारतातून कोणी visa अडचणींमुळे येवू शकलं नाही तेव्हा अमेरिकत आमचे आई – वडिल म्हणून कायम पाठीशी असलेले मेरी आणि डेव्हिड आणि आमचे मित्र जेरी आणि टॅमी हार्वी चौघांनी कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या पाठ करुन, करुन म्हटलं. आत्ता पाहिल्यावर गंमत तर वाटतेच पण एक – एक वाक्याचा या चौघांनी दिवस – दिवस केलेला सराव आठवून आमचे इथले सगेसोयरे होण्याची त्यांची आपुलकी मन हेलावून टाकते.
GIPHY App Key not set. Please check settings