अशीच ये समोरी ओल्या केसानिशी
मागितले काही तर म्हणू नको नाही
झाकला चेहरा कशाला या बटानी
तरीच चांदणे अजून पडलेच नाही
पहात रहावे आर्जव डोळ्यातले मी
मिठीत घेण्याचेही आज भान नाही
येतेस जवळ काळसुद्धा स्तब्ध होतो
शब्दांना बोलणे कसे ठाउक नाही
ओलेता स्पर्श जाणवतो ओठांना
जागेपणी कधी असे घडलेच नाही
आठवता तू नेहमी का हरवून जातो
वेंधळ्या मना स्वप्नी मी पाठवत नाही
GIPHY App Key not set. Please check settings