मघाचा पाऊस सारखा कोसळत होता. सूर्य दिसत नव्हता, ऊन पडत नव्हते. गडद भरून आलेले आभाळ सारखे सांडत होते. जंगलातील झाडांची खोडे शेवाळ्याने हिरवीगार झाली होती. ओढे-नाले खळाळत होते. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते.
कधीमधी जोरात पडणारा पाऊस दमगीर होऊन हळूहळू येऊ लागे. थेंबांचा आकार लहान होई. सतत चाललेला घोष मावळल्यासारखा वाटे आणि निळे- पांढरे धुके लोळत येई. दऱ्या भरून जात, झाडे दिसेनाशी होत. डोंगरांची
GIPHY App Key not set. Please check settings