इस्लामचा अर्थ व शिकवण
इस्लाम’ हा एक स्वतंत्र अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ शांतता प्रस्थापित करणे. अल्लाहवर संपूर्ण विश्वास नि श्रध्दा ठेवणे. अल्लाहला पूज्य आणि सर्व ब्रम्हांडाचा एकमेव स्वामी मानणे. त्याला लीनतेने शरण जाणे, त्याची अनन्यभावे प्रार्थना आणि उपासना करणे. त्याला सर्वस्व अर्पण करून त्याच्या आज्ञेबरहुकूम वागणे, त्याच्या आज्ञेच्या, शिस्तीच्या आणि प्रसन्नतेच्या विरूध्द कोणतेही वाईट काम न करणे.
‘इस्लाम’ म्हणजे मनुष्यमात्राचे स्वाभाविक व नैतिक जीवन सुरळीतपणे व्यतीत होणेकरिता, ईश्वराकडून काही उपदेशात्मक सत्याला नि नियमालाच ‘इस्लाम’ हे नामाभिधान देणेत आले आहे. इस्लाम सत्याचा पुरस्कार आणि असत्याचा प्रतिकार करण्याची आज्ञा देतो. तो प्रत्येकाला सदाचारी, सद्विवेकी नि सज्जन बनण्याचा आदेश देतो. अल्लाहची शिकवण आहे की, नेहमी सत्य बोला ! आपल्या तोंडातून गलिच्छ व ईश्वराला पसंत पडणार नाही असली कोणतीही अमंगळ भाषा काढू नका ! अत्याचाराने पातक जन्माला येते आणि पातकापासून मनुष्यमात्राची अपरिमीत अशी हाणी होते, म्हणून अत्याचाराने आपले हात विटाळू नका ! सर्वांशी न्यायबुध्दीने आणि शांततेते वागा ! कोणालाही उपद्रव करू नका व उपद्रवापासून सर्वांचे रक्षण करा ! सर्वांशी, प्रेमाची, आपुलकीची व बंधुभावाची वर्तणूक ठेवा ! यातच सर्व मानवजातीच्या उत्कर्षाची गुरूकिल्ली आहे.
जो इस्लामच्या या स्वाभाविक निमहतम् अशा शिकवणुकीनुसार वागणार नाही तो ईश्वराचा सर्वस्वी दोषी ठरेल. त्याच्याकडून ईश्वर आज्ञेचा अपमान होईल आणि त्याचा ईस्लामशी काडीचाही संबंध राहणार नाही. कारण एकेश्वराच्या विशाल व दैदिप्यमान अशा तत्वावरच इस्लाम धर्माची उभारणी झालेली आहे. इस्लामचे जे सच्चे, अनुयायी आहेत अशाप्रकारे मुसलमानाने इतर धर्माच्या संस्थापकांचा व त्यांच्या धर्माचा योग्य प्रकारे आदर व मानसन्मान केला पाहिजे. जो इस्लामच्या आदेशानुसार वागणार नाही त्यांचा अपमान करील, त्यांना तुच्छ लेखील तो इस्लामचा अनुयायी राहणार नाही.
अल्लाहने आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैवस्सलाम यांच्यावर ज्या ग्रंथाचे अवतरण केले तो ग्रंथ म्हणजे पवित्र कुरआन, प्रेषित साहेबांनी आपल्या आचरणाने, वर्तणुकीने आणि विचारसरणीने या ग्रंथाचे स्पष्टीकरण जगापुढे ठेवले. त्यांचे नाव सुन्नत म्हणजे पवित्र परंपरा आहे. कुरआन आणि सुन्नत या दोहोना मिळून ‘इस्लाम’ म्हटले आहे. एका आदर्श, परिपूर्ण जीवन पध्दतीचे दुसरे नाव इस्लाम आहे. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलाम यांचा जगावर सर्वश्रेष्ठ उपकार हाच आहे की त्यांनी या ईस्लामी जीवन पध्दतीला योग्य आणि सत्य, श्रध्दाशिलतेने आणि विचारसरणीने आभूषित केले. श्रेष्ठ चारित्र्यशीलता, नितीमुल्ये आणि न्यायधिष्ठित विधीव्यवस्था प्रदान केली. पवित्र संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेने प्रकाशित केले आणि एक अशी आदर्श आणि परिपूर्ण जीवन व्यवस्था जगाला उपलब्ध करून दिली. ज्यात मानवतेची मुक्ती आणि कल्याण आहे.
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांच्या शिकवणुकीचा आढावा पुढीलप्रमाणे मनुष्यासमोर हा प्रश्न नेहमीसाठीच उभा ठाकला आहे की, हे विश्व कशासाठी निर्माण केले आहे? काय हे विश्व असेच चालत राहणार आहे की कधीकाळी त्याचा अंत होणार आहे? मनुष्याने आपले जीवन कशाप्रकारे व्यतीत करावे ? मनुष्याचे जीवन-मापन करण्यासाठी निश्चित अशी एखादी जीवनप्रणाली आहे किंवा त्याला अंधारात टाकण्यासाठी जगात सोडून दिले आहे? त्याचा सदाचारांचा आणि दुराचारांचा मोबदला त्याला कधी मिळणार ह्या प्रश्नांच्या अचूक उत्तरानेच मनुष्याने जीवनमापन सत्यमार्गावर चालते.
आदरणीय प्रेषित साहेबांच्या शिकवणीत वरील प्रश्नांची उत्तरे योग्य आणि अचूकपणे सापडतात. ते असे की हे विश्व स्वतःहून अचानक अस्तित्वात आले नाही त्याला अनेकानेक शक्तींनीसुध्दा निर्माण केलेले नाही तर या सृष्टीला एकाच ईश्वराने निर्माण केले आहे. तोच या सृष्टीला नियंत्रित करत आहे. तो एकमेव आहे आणि त्याचा कोणीही भागीदार नाही. अल्लाह मनुष्य जातीचा निर्माणकर्ता आहे, पालनकर्ता आहे व शासनकर्ता आहे.


GIPHY App Key not set. Please check settings