नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय जपानमधील साय-फाय थ्रिलर ‘अॅलिस इन बॉर्डर लँड’ (Alice in Borderland) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रचंड यशानंतर, निर्मात्यांनी या मालिकेच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मृत्यू आणि जीवनाच्या सीमारेषेवर आधारित या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि यावेळी खेळ अधिक धोकादायक आणि रहस्यमय असणार आहे. (Alice in Borderland Season 3)
कलाकारांची फौज
‘अॅलिस इन बॉर्डर लँड’च्या तिसऱ्या सीझनमध्ये मूळ कलाकार पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहेत. केंटो यामाझाकी (अरिसु) आणि ताओ त्सुचिया (उसगी) हे मुख्य भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबतच हयातो इसोमुरा (बंदा), अयाका मियोशी (ॲन) आणि कात्सुया मायगुमा (याबा) हे कलाकारही आपल्या भूमिकांमध्ये परतणार आहेत.
या सीझनमध्ये काही नवीन कलाकारांचीही भर पडली आहे, ज्यात केंटो काकू, कोजी ओकुरा, कोटारो डायगो, रिसा सुडौ, टीना तमाशिरो, ह्युनरी आणि हिरोयुकी इकेउची यांचा समावेश आहे. त्यामुळे या नवीन पात्रांमुळे मालिकेची रंगत आणखी वाढणार आहे.
(Alice in Borderland Season 3) सीझन ३ ची कथा काय असेल?
मागील सीझनमध्ये, अरिसु (केंटो यामाझाकी) आणि उसगी (ताओ त्सुचिया) यांनी बॉर्डर लँडमधील सर्व खेळ यशस्वीरित्या पूर्ण करून वास्तविक जगात पुनरागमन केले होते. त्यानंतर ते एक सामान्य आयुष्य जगू लागतात आणि लग्नही करतात. पण बॉर्डर लँडच्या आठवणी त्यांना स्वप्न आणि भ्रमांच्या रूपात सतत त्रास देत असतात.
कथेला एक अनपेक्षित वळण तेव्हा मिळते, जेव्हा उसगी अचानक गायब होते. तिला शोधण्यासाठी अरिसुला पुन्हा एकदा त्याच धोकादायक बॉर्डर लँडमध्ये परतावे लागते. यावेळी, त्याला ‘जोकर’ नावाच्या एका नवीन आणि रहस्यमय खेळाचा सामना करावा लागणार आहे, जो मूळ मांगामध्ये नव्हता. त्यामुळे या सीझनमध्ये एक नवीन आणि थरारक कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.
प्रदर्शनाची तारीख
‘अॅलिस इन बॉर्डर लँड’चा तिसरा सीझन (Alice in Borderland Season 3) २५ सप्टेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन शिन्सुके सातो यांनी केले आहे, ज्यांनी मागील दोन सीझनचेही दिग्दर्शन केले होते. त्यामुळे याही वेळी एक उत्कृष्ट आणि रोमांचक अनुभव प्रेक्षकांना मिळेल अशी अपेक्षा आहे.
मालिकेचा नवीन टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता चाहते २५ सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा ते पुन्हा एकदा अरिसु आणि उसगीसोबत बॉर्डर लँडच्या धोकादायक जगात प्रवेश करतील.
The post ‘अॅलिस इन बॉर्डर लँड’ सीझन ३: नव्या रहस्यांसह आणि थरारक खेळांसह परतणार!-Alice in Borderland Season 3 appeared first on HALTI CHITRE.
GIPHY App Key not set. Please check settings