in

अवघा तो शकुन ! हृदयी देवाचे चिंतन

आज संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. संत गजानन महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या मार्गस्थ आधीच झाल्यात. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही एक दोन दिवसात निघेल. असंख्य वारकरी   ‘तन-मन- धनाने’ या सोहळ्यात वेगवेगळ्या प्रकारे सामील होतील. गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी निर्माण झालेली  ‘ Nigativity’,विचित्र मानसिक अवस्था, भिती, ग्रह योग, या सगळ्या परिस्थितीला सामोरे जायची शक्ती मिळणार आहे ती भक्ती मार्गातूनच
म्हणूनच
 तुका म्हणे हरिच्या दासां
शुभकाळ अवघ्या दिशा !
हा आलेला विचार मनाला उभारी देतो. भले शरीराने आपण देहू, आळंदी ते पंढरपूर नसू ही जात
तुका म्हणे सोपी केली पायवाट !
उतरावया भवसागर रे !
सोशल मिडीया, न्यूज चँनेल्स, वृत्तपत्रे यातून हा अनुपम्य सोहळा आपण अनुभवणार आहोत
काय या संतांचे मानू उपकार !
मज निरंतर जागविती !!
पांडुरंग ध्यानी,पांडुरंग मनी !
जागृतीं स्वप्नीं पांडुरंग !!
मनाची एवढी एकरूपता २४x ७ सर्वांना जमेलच असं नाही पण वृत्ती तशी ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा
तुका म्हणे  जैसें दास केले देवा
तैसें हे अनुभवा आणि मज !!
आषाढी एकादशीपर्यंतचे अनेक खेळ या वाळवंटी रचत, या सोहळ्याची सांगता चंद्रभागेच्या तिरी , पंढरपूर या भक्तांच्या माहेरी होईल
पण कायमस्वरूपी, 
तुका म्हणे जीवा !
नको सोडू या केशवा !!
*हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा*🙏
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 📝
१८/०६/२५

Read More 

What do you think?

27 Points
Upvote Downvote

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान – १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती…

श्री दत्त करुणा त्रिपदी- संजीव अभ्यंकर