गौरी मेहंदळे शार्लटमधली लेखिका आणि गुणी कलाकार. तिने माझी आणि विरेनची मुलाखत घ्यायची ठरवली आणि दोघांची झोप उडाली. विरेनची, मुलाखत द्यायची म्हणून आणि माझी, मुलाखतीत विरेन काय बोलेल म्हणून😊.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो असं म्हटलं जातं. आम्ही यशाच्या मागे न धावता एकमेकांबरोबर धावत राहिलो त्यामुळे
एकमेकांच्या मागे उभं राहण्याचा प्रश्नच आला नाही आणि यशस्वी आहोत की नाही हा विचार करण्याचाही 😊.
नवरा – बायकोने एकत्र काम करणं सोपं नसतं तसंच एकत्र मुलाखत देणंही. तरीही ते केलं आहे. विरेनची ही पहिलीच मुलाखत आहे. नक्की बघा. youtube वर अभिप्राय द्या आणि गौरीच्या वाहिनीचे सभासदही व्हा.
GIPHY App Key not set. Please check settings