माझा भाव तुझे चरणी |
तुझे रूप माझे नयनीं || धृ ||
सापडलो एकामेकां |
जन्मोजन्मी नोहे सुटका || १ ||
त्वां मोडिली माझी माया |
मी तो जडलो तुझिया पायां || २ ||
त्वां मज मोकविले विदेही |
मी तुज घातले हृदयीं || ३ ||
नामा म्हणे गा सुजाना |
सांग कोठे ठकविलें कोणा ? || ४ ||
GIPHY App Key not set. Please check settings