in

अन्योन्य योग

ज्योतिष शास्त्रात हा एक विशेष योग आहे. अनेक पत्रिकेत तो बघायला मिळतो. साधारण पणे या योगाचे शुभ फळ सांगितले आहे
हा योग कसा होतो? तर
एक ग्रह, दुस-या ग्रहाच्या राशीत असताना जर तो दुसरा ग्रह पहिल्या ग्रहाच्या राशीत असेल तर हा योग होतो.
 अगदी सध्याचे उदाहरण बघा
शुक्र – मीन राशीत ( गुरु ग्रहाच्या राशीत)
गुरु ग्रह – वृषभ राशीत ( शुक्र ग्रहाच्या राशीत)
तेंव्हा सध्या जन्माला आलेल्या बालकांच्या पत्रिकेत गुरू-शुक्र ‘अन्योन्य योग’ झाला आहे
हाच योग मला आजच्या विजया एकादशी आणि परवाच्या माहाशिवरात्रीत दिसून येतोय
सोमवार- महादेवांचा दिवस- एकादशी
बुधवार – श्रीविष्णूंचा दिवस – महाशिवरात्री
अन्योन्य महोत्सव
श्री महादेव व श्री विष्णू यांची अखंड कृपा आपणा सर्वांवर राहो 🙏🙏
( गंमत म्हणजे गुरू-शुक्र एकमेकांचे शत्रू तर शंकर आणि विष्णू यांचे भक्त ही एकमेकांना शत्रू मानत असंत)
ॐ नम: शिवाय ! गोविंदाय नमो नम!
#देवा तुझ्या द्वारी आलो 📝
#विजया एकादशी 🙏
#महाशिवरात्री 🙏

#अन्योन्य योग 🙏 Loading…

Read More 

What do you think?

27 Points
Upvote Downvote

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

श्री दासनवमी

चुंबन-चिकित्सा