YouTube Special: Power, Grace, and Intelligence - Personified !!

By vrusathalye on from marathisumane.blogspot.com

नमस्कार,गेले काही दिवस अमेरिकन इलेक्शनच्या निमित्ताने बरेच व्हिडीओज बघणे होत आहे. आजचा लेख हा फक्त एक व्यक्तिचित्र आहे. इलेक्शनचे राजकीय विश्लेषण अर्थातच नाहीये.मिशेली ओबामा - अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी. माझ्या मते राष्ट्राध्यक्षांइतकीच (किंबहुना थोडी जास्तच) प्रसिद्ध झालेली मिशेली. अर्थात तिचे स्वतःचेही कर्तृत्व कारणीभूत  आहे त्याला. जमिनीतून उगवून एका महाप्रचंड वृक्षात रूपांतर व्हावे अशीच या उभयतांची कारकीर्द. अतिशय मध्यमवर्गातून आलेली, हार्वर्ड लॉ-स्कूल मध्ये शिकलेली, स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, अमेरिकेसारख्या अतिसंपन्न देशात "let's move" चळवळ सुरु करणारी, व्हाईट हाऊस मध्ये vegetable गार्डन तयार करणारी, ellen च्या रिऍलिटी शो मध्ये येऊन push-ups challenge सहजपणे स्वीकारणारी, देशाच्या military families साठी अनेक उपक्रम राबवणारी आणि तितक्याच खेळकरपणे Sesame Street मध्ये जाऊन सकस अन्न आणि व्यायाम यांचे महत्व लहान मुलांनाही पटवणारी अशी ही अष्टपैलू मिशेली !! त्या दोघांनी त्यांची ही इमेज अतिशय जाणीवपूर्वक तयार केली असेल कदाचित, त्यामागे सर्वसामान्यांना ना कळणारी अतिशय complex राजकीय गणितेही असतील, पण तरीही, 8 वर्षात जगाच्या रंगमंचावर एका (almost) सर्वात बलाढ्य, सामर्थ्यशाली व्यक्तीची पत्नी ही भूमिकाच मुळात खरोखरी अवघड आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आणि मिशेली ही भूमिका पूर्ण तन्मयतेने, आणि तितक्याच gracefully जगली. तिची oratory skills, almost स्लोगन्स झालेली अशी "Books before Boys", किंवा "When they go Low, we go High" अशी वाक्ये, तिचे बराक ओबामांविषयी कौतुकाने बोलणे, तिचा सर्वत्र सहज वावर, तिचा फिटनेस.. She is definitely a charm !! We will certainly miss you Michelle !!!!हे खाली दिलेले व्हिडीओज खास करून मिशेलीची "दोन मुलींची आई" अशी घरगुती इमेज highlight करणारे. कोणत्याही मध्यमवर्गीयाला जवळचे वाटतील असे -Michelle on Motherhood, Me time, and all No-Nonsense Stuff
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!