Marathi Article: जीवनाची वाट तुडवताना

By kattaonline on from www.kattaonline.com

Penny wise, Pound foolish! अशी एक म्हण इंग्रजीत आहे. पण खरंतर लहान लहान गोष्टींची काटकसर करायला शिकलं की मोठ्या गोष्टींची  काटकसर कळत नकळत होत राहते. निसटलेला पहिला टाका वेळेवर घातला तर पुढचे नऊ टाके वाचतात अशा अर्थाची म्हण त्या म्हणीच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणावी लागेल.कोणत्याही बाबतीत सुरवात छोट्या गोष्टीपासून व्हावी म्हणजे मोठयाचे आगमन शेवटी आनंददायी वाटते. लहान सहान पदावरून काम करत गेलेला माणूस ज्यावेळी मोठ्या अधिकारावर जातो तेव्हा त्याच्या कामातच नव्हे तर वागण्या-बोलण्यात एक प्रकारची खोली व समृद्धी येते. आजकाल विपुलतेचा जमाना आला आहे. लहान मुलांना डबा भरून चॉकलेट, फ्रीजभरुन कॅडबरीज, चप्पल स्टेन्ड भरून वाहणारे शूज, शोधण्यांत दिवस जाईल एवढे कपडे, शाळेचे साहित्य, वह्या पेन, पुस्तके, टिफिन, खेळणी, सायकली हा खेळ शेवटी तारुण्यात पदार्पण करेपर्यंत मोबाईल, सीडीज, कॉम्पुटर, व्हिडीओ गेम्स आणि पॉकेटमनीनी ओथंबलेल्या खिशापर्यंत जातो.एवढी साधने पुरवूनही कुठल्याच दिशेने त्यांची साधना होत नसल्याने आई-वडीलांची स्थिती मात्र काहीच "साधे ना" अशी होते. त्यापेक्षा साधे रहा या विचाराने वेळीच रोपण केले असते आणि वस्तूपेक्षा माणसांचा सहवास आणि पुस्तकांशी मैत्री, खेळण्याच्या पसाऱ्याऐवजी मैदानातील खेळ आणि काटकसरीतून फुलणारे गुणवत्तेच्या दिशेने नेणारे नेटके शिक्षण झाले असते तर ते बालफुल पूर्ण क्षमतेने फुलले असते. पण आता त्या फुललेल्या घटत्कोचाला सांभाळणे पालकांच्या शक्तीबाहेरचे ठरते.पुढे वाचा »
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!