Love Poem , Prem Kawita : मी तुझ्या श्वासात आहे

By vijayshendge on from maymrathi.blogspot.com

स्त्री तिचं पाहिलं प्रेम कधीच विसरत नाही असं म्हणतात.पण खरंतर स्त्रीच काय कोणतीही व्यक्ती आयुष्यात कोणतीही घटना कधीच विसरत नाही. प्रेम तर कधीच विसरता येत नाही.आणखी एक गोष्ट जगात कुणाचंही प्रेम डोंगर उतारावरून एखादा दगड घरंगळत पायथ्याशी यावा इतक्या सहजपणे प्रेम कधी शेवटला जात नाही, किनाऱ्याला लागत नाही. अनेक अडचणी.........कधी घरच्यांचा विरोध........कधी समाजाचे शिंतोडे.........कधी परस्परातले गैरसमज...........कधी वैचारिक मतभेद..........कधी अपेक्षांच्या कठपुतळ्या. एक ना अनेक हजार अडचणी.या सगळ्यातून तरून किनाऱ्याला लागणारं प्रेम एखादंच. इतर सगळ्याच्या पदरी एक हुरहूर. भोवतीने आठवणींचा पसारा. त्या आठवणींनी व्याकुळ होणारं काळीज. मग मनात आकार घेणाऱ्या ओळी. आपल्या प्रेमावरचा विश्वास पाहून आपल्याच ओठावर फुलणारं हसू.अशाच या ओळी. तिच्या मनात आकार घेणाऱ्या. खरंतर तिची केवढी भक्ती त्याच्यावर. केवढं प्रेम. पण नात्यागोत्यांच्या झटापटीत तिला तिच्या प्रेमाचा हात सोडवा लागतो.आयुष्याचं दान दुसऱ्या कुणाच्यातरी ओंजळीत द्यावं लागतं. ती तिथंही रमून जाते. चोहो अंगानं आयुष्य फुलवण्याचा प्रयत्न करते. पण कधी तरी मनात अशा ओळी आकार घेतात -
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!