हिंदू काल गणनेनुसार आठ प्रहर, ब्राह्म मुहूर्त आणि सूर्योदय. उपासनेचे फळ केवळ अशाप्रकारे वेळ पाळण्यामुळे मिळतं
By vedicjyotish on धार्मिक from https://vedicjyotishmail.blogspot.com
उपायांसाठी व कुठल्याही धार्मिक कार्यासाठी अचूक घटिका कशी साधावी? बऱ्याच लोकांना पहाटेच्या ब्राम्ह मुहूर्ताविषयी खूप शंका आहेत. सगळ्यांना वाटतं कि ब्रह्म मुहूर्त म्हणजे एकाच वेळ असते. तसं नसतं. भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक शहरात/राज्यात/देशात सूर्योदय हा वेगवेगळ्या नुसार होतो. पंचागात देखील हि माहिती असते. ऑनलाईन पंचांगात सुद्धा तुमच्या शहराचे नाव निवडलेत कि ते सॉफ्टवेअर आपोआप तुम्हाला तुमच्या सोईची वेळ दर्शवते. पण प्रश्न हा आहे कि वेळ समजली तरी अचूक वेळ कशी माहित करून घ्यायची. विविध जपानची सुरुवात, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, होम-हवन, पूजा-अर्चा, यज्ञ-याग, वगैरे प्रत्येक कार्याकरिता हि अचूक वेळ माहिती करून घेणे आवश्यक आहे. तरच योग्य संकल्प घेऊ शकाल. आणि संकल्प योग्य घेतलात तरच केलेल्या उपासनेचे फळ मिळेल, नाहीतर नाही. कारण संकल्पाशिवाय सिद्धी नाही, असा नियम आहे. आता ब्राह्म मुहूर्त कसा शोधायचा? सूर्योदयाच्या नेमका किती काळ तो आधी येतो? प्रहर कसे मोजायचे? अचूक घटिका कशी शोधायची? हे सगळं आपण या लेखात पाहूयात...प्रहर म्हणजे काय? एकूण किती प्रकारचे प्रहर असतात? २४ तासांचा एक दिवस असतो. एका दिवसात एकूण ८ प्रहर असतात. (म्हणून २४ तासाला अष्टौप्रहर हा शब्द प्रचलित आहे.) प्रत्येक प्रहर हा ३ तासांचा असतो. दिवसाचे ४ आणि रात्रीचे ४ असे एकूण आठ प्रहर होतात. प्रहरांचे विभाजन पुढीलप्रमाणे आहे :-पूर्वान्ह : (दिवसा) ०६ ते ०९ मध्यान्ह : (दिवसा) ०९ ते १२ अपरान्ह: (दिवसा) १२ ते ०३ सायंकाल: (दिवसा) ०३ ते ०६ प्रदोष : (रात्री) ०६ ते ०९निशिथ : (रात्री) ०९ ते १२ त्रियाम : (रात्री) १२ ते ०३ उषा : (रात्री) ०३ ते ०६ घटिका म्हणजे काय? आधुनिक काल गणनेनुसार घटिका कशी मोजतात? सोप्या भाषेत सांगायचं तर घटिका म्हणजे वेळ. आधुनिक म्हणजे आजच्या कालगणनेनुसार एक घटका म्हणजे २४ मिनिटे. या प्रकारे अडीच घटका म्हणजे एक तास होतो.(२४+२४+१२ =६०) ब्राह्म मुहूर्त नेमका किती वाजता येतो? साधारणपणे तुमच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे ३ ते ५ हा कालावधी ब्राह्म मुहूर्त म्हणून धरता येईल. त्यानंतर ३६ मिनिटांनी उषा काल सुरु होतो. तो पहाटे ०५ ते ०५:३६ मिनिटे असतो. त्यानंतर २४ मिनिटांनी प्रभात होते. ती पहाटे ०५:३६ ते ०६:०० पर्यंत असते. त्यानंतर ६ मिनिटांनी अरुणोदय होतो. तो ०६:०० ते ०६:०६ इतका वेळ असतो. आणि मग सूर्योदय होतो. उष:काळ. प्रभात, अरुणोदय आणि सूर्योदय या वेगवेगळ्या वेळा आहेत. काही लोक, अगदी मोठमोठे ज्योतिषी आणि पुरोहित सुद्धा मुहूर्त सांगताना जुन्या ग्रंथात जर अरुणोदयाची किंवा प्रभातेची वेळ दिली तर सरळ सूर्योदयाची वेळ गृहीत धरून मुहूर्त काढून देतात.तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात कि अमुक जप कधी सुरु करू? अनुष्ठानासाठी किंवा इतर धार्मिक कार्यासाठी सुयोग्य मुहूर्त कोणता? आणि नुसता मुहूर्त बघायला इतका वेळ का घेता? पंचांग बघून किंवा केलेंडर बघून पटकन मुहूर्त का सांगत नाही? मी अमुक एक उपाय किंवा शांत केली आहे पण फरक पडलेला नाही, वगैरे. तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात मिळाली असतील अशी अपेक्षा करतो. दिवसाचे प्रहर कसे बदलतात, आणि घटिका जरा जरी चुकली तरी वेगळाच मुहूर्त कसा लागू होऊ शकतो, हे त्यातून सिद्ध होतं. त्यामुळे ठरवलेल्या पेक्षा वेगळ्याच नक्षत्रात कार्याची सुरवात झाली तर ज्याचा काहीही उपयोग होत नाही. एवढ्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तींसाठी मुहूर्त शोधणं सोपं काम नाही. असा विविध प्रकारे सूक्ष्म अभ्यास करून शक्यतो अचूक मुहूर्त देण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. बाकी सगळं देवाच्या आणि गुरु महाराजांच्या हातात आहे. तुम्हाला जर कुठल्या कार्यासाठी मुहूर्त काढून हवा असेल तर इथे संपर्क करा.