शुभेच्छा कॉमामॅन साठी
By Rupali_Thombare on कविता from umatlemani.blogspot.com
स्वल्पविराम... कायम सामान्य वाटणारा भाषेतला एक सुंदर आकार आणि अशोक सर ... या सामान्य आकाराला आसामान्य बनवणारा एक चित्रकार घडवून रेषांचे मिलन... कृष्ण-धवल रंगछटांत न्हाऊन जिवंत होणारे आभासी आकार जणू दुनियेची सुरेख एक सैर... आवर्तनांतून मनाच्या संवेदनांना स्पर्श करणारा अनुभवांचा सागर तव सारे अनुभव... प्रत्येक चित्रात उतरत वर्धत राहावा तुमच्यातला सदाबहार कलाकारशुभेच्छा हीच आज... कोणत्याही पूर्णविरामाशिवाय तुमचे प्रत्येक स्वप्न होत राहावे साकार- रुपाली ठोंबरे.