विस्कळीत 'ब्लॅक होम' (Movie Review - BLACK HOME)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
एक संशयास्पद रिमांड होम. 'राजावाडी रिमांड होम'. जिथल्या मुलींवर अनन्वित अत्याचार केले जात असतात. त्यांचा व्यवसायही केला जात असतो. ह्या सगळ्याची खबरबात समाजसेवक राघव आणि सरिता एका टेलिव्हिजन वृत्तवाहिनीचा अधिकारी डी.के. (आशुतोष राणा) पर्यंत पोहोचवतात. ह्या मागे बरंच मोठं रॅकेट असण्याची शक्यता बेरकी व चाणाक्ष डी. के. जाणतो आणि त्याच्यावर आधीच अनेकांची नजर असल्याने तो दुसऱ्या कुणाकरवी ह्या