विवाह आणि घरजावई होण्याचे योग. पुत्र सासुरासी जाये, मागे परतोनी न पाहे
By vedicjyotish on धार्मिक from https://vedicjyotishmail.blogspot.com
तुम्हाला घरजावई व्हायला आवडेल का? उत्तर 'हो' असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. यात आपण ज्योतिषानुसार आणि काही प्रमाणात वास्तूनुसार घरजावई होण्याचे योग कसे असतात याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया...आपल्या पत्रिकेतील द्वितीय स्थान हे आपले स्वतःचे कुटुंब स्थान असतं. चतुर्थ स्थान हे गृहसौख्याचे स्थान. सप्तम स्थान हे जोडीदाराचे स्थान, आणि अष्टम स्थान हे सासुरवाडीचे स्थान. तेव्हा या कुटुंब स्थानाचा जेव्हा अष्टम स्थानाशी आणि सप्तमेशशी संबंध येतो तेव्हा मुलगा घरजावई होतो असा अनुभव आहे. संबंध म्हणजे कुटुंब स्थानावर पापग्रहाची दृष्टी किंवा युती आणि अष्टम स्थानी शुभ ग्रह. किंवा जर मुलाच्या पत्रिकेत चंद्र निर्बली असेल आणि मुलीच्या पत्रिकेत तो बलवान असेल. किंवा मुलीच्या पत्रिकेत द्वितीय स्थान हे खूप बलवान असेल आणि अष्टम स्थान निर्बली असेल तर मुलगी हमखास नवऱ्याला घेऊन कायमची माहेरी रहायला येते.यात भर म्हणून जर मुलीच्या राहत्या वास्तूत ईशान्य दिशा खूप जास्त बलवान असेल तर मग मुलाचे घरजावई होणे नक्कीच समजा. याशिवाय यासारख्या अंशात्मक कुंडल्या देखील खूप काही सांगतात. त्या कुंडल्या अभ्यासण्याचे काही नियम वेगळे असल्यामुळे त्यांना वेगळे महत्त्व आहे. जाता सासुरवाडीला... उत्कर्ष वाढीला... ज्यांच्या कुंडलीत पंचमेश आणि सप्तमेशाची युती असेल तर सासरकडची मंडळी खूप श्रीमंत असतात आणि जावयाचे खूप लाड पुरवतात. लग्नाआधी ज्यांना आयुष्यात अजून फारसं यश मिळालेलं नाही, अशा जातकांच्या पत्रिकेत जर हे योग असतील तर त्यांचा खरा उत्कर्ष हा लग्नांनंतरच होतो. ते Rags to Riches म्हणतात, अगदी तसं. मुलगा सारखं सारखं बायकोच्या माहेरी जातो तेव्हा ..."'काय रे, सारखं सारखं सासुरवाडीला काय जातोस? तिथे काय गाठोडं पुरून ठेवलंय का?', असं शेवटी मी एक दिवस त्याला विचारलं, तर सरळ 'हो' म्हणाला आणि निघून गेला. लग्न झाल्यापासून घरात याचं बूड स्थिर राहत नाही. सारखं बायकोला घेऊन तिच्या माहेरी जाऊन बसतो. तिथे जाऊन घरादाराचा अपमान करून घेऊन मगच ऐकेल कि काय असं वाटतंय. काय करू मी म्हणजे ऐकेल तो माझं?" एक बाई मला त्यांच्या मुलाच्या पत्रिकेविषयी प्रश्न विचारत होत्या. त्या मुलाच्या पत्रिकेत सुद्धा थोड्याफार फरकाने असेच योग होते. त्यात भरीसभर म्हणजे कुटुंब स्थानी केतू आणि अष्टम स्थानी राहू होता. अशा जातकाला स्वतःच्या घराविषयी अजिबात ओढ नसते. सासुरवाडीची माणसं जे सांगतात तेच सगळं खरं असा त्यांचा पक्का समज झालेला असतो. आपल्या आयुष्याचं जर काही भलं होणार असेल तर ते केवळ सासुरवाडीकडची मंडळीच करू शकतील असा त्यांना वाटतं. त्यामुळे ते वारंवार बायकोच्या माहेरी जातात. मेहुण्याशी फार छान जमवून घेतात. सासू-सासऱ्यांना कधीही दुखवत नाहीत. खूप लोकांच्या पत्रिकेत असे योग असतात ज्यामुळे संसाराची मंडळी त्यांना खूप लाभदायक ठरतात. माझा एक शेअर मार्केट शी संबंधित क्लायंट आहे. त्याच्या पत्रिकेतसुद्धा हा योग होता. मी त्याला सांगितलं मोठा ट्रेड घ्यायच्या आधी सासऱ्यांना एक फोन करत जा. (कारण बुध हा जसा सासऱ्यांच्या कारक आहे, तसाच तो कम्युनिकेशन चा सुद्धा कारक आहे.) त्यामुळे केवळ सासरेबुवांना एक फोन केल्यामुळे त्याचे ट्रेड्स बरोबर बसायला लागले आहेत. शेवटी ग्रह आणि त्यांचे कारकत्व सगळं काही पत्रिकेतच असतं. आपल्याला केवळ त्यांचा स्वतःच्या उत्कर्षासाठी वापर करून घेता आला पाहिजे. तुमच्या पत्रिकेत पण असे घरजावई होण्याचे योग आहेत का हे पाहायचे असेल तर लगेच इथे संपर्क करा.