वाईट स्वप्नं, रात्री घाबरून उठणे, आणि स्वप्नांचे अर्थ यावर सविस्तर मार्गदर्शन
By vedicjyotish on धार्मिक from https://vedicjyotishmail.blogspot.com
स्वप्नांकडे कधी दुर्लक्ष करू नका. त्यांच्या माध्यमातून तुमचं अंतर्मन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय... कधी तुमचं कुलदैवत/ कुलस्वामिनी तुम्हाला स्वप्नांच्यामार्फत काही संकेत देत असते, कधी देवदूत, कधी पितर...तर कधी नुकतीच देवाघरी गेलेली तुमच्या जवळची व्यक्ती, नातेवाईक, मित्र किंवा अगदी पाळीव प्राणी. आपण आपलं आयुष्यात जगण्यात मग्न असतो त्यामुळे हे असले गुप्त स्वरूपाचे संकेत आपल्याला कळत नाहीत म्हणून या सगळ्या शक्ती आपल्याला विविध मार्गाने संकेत देत असतात. जेव्हा सजग मनाने आपल्याला गोष्टी समजत नाहीत, तेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला त्या अशा मार्गाने लक्षात आणून देतं. मग ते स्वप्न कशाही प्रकारचं असो, चांगलं स्वप्न, भीतीदायक स्वप्न, तणावग्रस्त स्वप्न, अध्यात्मिक स्वप्न, प्रसिद्ध व्यक्ती राजकारणी-अभिनेते वगैरे असलेलं स्वप्न, प्राणी-पक्षी असलेलं स्वप्न किंवा देवादिकांची स्वप्नं. ती सगळी स्वप्नं बऱ्याचदा एकाच हेतूने प्रेरित असतात तो म्हणजे तुम्हाला काहीतरी लक्षात आणून देणं. करायची राहून गेलेली एखादी गोष्ट आठवून देणे किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी सावध करणे, एखाद्या व्यक्तीपासून सावध करणे, इत्यादी. चला तर मग बघूया ...वाईट स्वप्नं आणि जन्मकुंडली तुमच्या जन्मकुंडलीतील १२ वे स्थान हे स्वप्नांचे स्थान म्हणून पाहतात. गाढ झोप, निद्रानाश, समाधी लागणे, मोक्षप्राप्ती, अध्यात्मिक साधना, अतींद्रिय शक्तीचा विकास, ध्यानधारणा, वगैरे गोष्टी या स्थानावरून पहातात. अंशात्मक कुंडलीतीळ द्वादशांश कुंडली चा अभ्यास इथे उपयुक्त ठरतो कारण ती कुंडली आई-वडिलांकडचे पितर बघतानासुद्धा काही प्रमाणात वापरतात. हि अंशात्मक कुंडली तुमच्या जन्म कुंडलीतील १२ व्या स्थानाचे सूक्ष्म भाग पडून तयार केली जाते आणि मग त्याचा सखोल अभ्यास केला जातो. हा अभ्यास खूप सूक्ष्म पातळीवरचा आहे. तुम्हा सगळ्या क्लायंट्सना माझी अभ्यासाची पद्धत माहितीच आहे. नैसर्गिक कुंडलीत बाराव्या स्थानाचा स्वामी गुरु महाराज आहेत. त्यामुळे कुलदैवतेशी संबंध येतो. त्याचबरोबर ग्रहांचे भ्रमण, महादशा आणि अंतर्दशा याचादेखील परिणाम होत असतो. त्यामुळे नेमक्या कुठल्या ग्रहांमुळे तुम्हाला स्वप्नांचा त्रास होतो आहे हे कळेल. आणि त्यावरून नक्की कुणाकडून संकेत मिळत आहेत किंवा नाहीत हे समजेल. हे मार्गदर्शन कशाप्रकारचे आहे?तुम्हाला जर एका वाक्यात उत्तर हवं असेल तर हे मार्गदर्शन तुमच्यासाठी नाही. उदा. "मला स्वप्नात साप दिसला, याचा अर्थ काय?" या प्रश्नावर बरेचसे ज्योतिषी 'राहू चा दोष, कालसर्पदोष आहे' असे सांगतात आणि "शंकराला अभिषेक करा किंवा लघुरुद्र करा" असा उपाय सांगतात. मी हे उपाय सांगत नाही. कारण प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असते. त्यामुळे स्वप्नात साप दिसण्याचं कारण वेगळं असू शकतं. मी दोन प्रकारचं मार्गदर्शन देतो:1) सविस्तर मार्गदर्शन तुमच्या जन्मपत्रिकेच्या वर नमूद केल्याप्रमाणे सखोल अभ्यास करून नक्की कुठल्या ग्रहांमुळे किंवा इतर कारणामुळे त्रास होतो आहे हे शोधून काढून त्यानुसार मार्गदर्शन. 2) सविस्तर मार्गदर्शन आणि लाईफ कोचिंग या प्रकारात पहिल्या प्रकारचा सविस्तर मार्गदर्शन असतं आणि त्याच्यासोबत मनात खोलवर रुतून बसलेल्या भावना, लहानपणीपासूनच्या चांगल्या-वाईट आठवणी, भावनिक आघात/जखमा, नातेसंबंधांत आलेला कडवटपणा, गैरसमज, दुरावलेपण, इत्यादी प्रकारच्या भावनिक गोष्टींवर देखील मार्गदर्शन असतं. बऱ्याचवेळेला मला असा अनुभव आला आहे कि लोक उगाच स्वतःला दोष देत बसतात. पडलेल्या स्वप्नांचे स्वतःला सुचतील तसे किंवा वेबसाईटवर शोधून किंवा कुठल्याशा स्वप्नांचे अर्थ दिलेल्या पुस्तकातून वाचून स्वप्नांचे अर्थ लावत बसतात. त्यातून कुठल्यातरी विचित्र कल्पना जन्माला येतात आणि त्या खऱ्या मानून लोक त्याला घाबरून आयुष्य जगतात. देव, देवदूत, तुम्हाला सोडून गेलेले नातेवाईक, मित्र किंवा पाळीव प्राणी यांना तुम्हाला कुठलातरी संदेश पोचवायचा असतो आणि त्यासाठी ते अशा सांकेतिक माध्यमाचा वापर करतात. स्वप्नाचा अर्थ वाईटच असेल असे नाही हो. कधीकधी वाईट स्वप्नाचा अर्थ सुद्धा चांगला असतो. उदा. काच फुटली तरी आपण शुभ शकुन मानतो, तसं. आजकाल लोक बारीकसारीक गोष्टीत सुद्धा अतितर्क वापरायला लागलेले आहेत त्यामुळे स्वप्न वाईट पडलं तर त्याचा अर्थ काही वाईटच घडेल असं धरूनच ते चालतात. हे सगळं चूक आहे. त्यांना स्वप्नाचा अभ्यास योग्य प्रकारे कसा करावा हे माहित नसल्यामुळे असं गोंधळ उडतो. म्हणून मी नेहमी सांगतो कि सगळ्यात आधी जन्मकुंडली दाखवून घ्या आणि निर्धास्त व्हा. या मार्गदर्शनामुळे तुम्हाला गुप्त असलेले संदेश आणि योग्य संकेत समजतात ज्यामुळे तुम्ही भविष्याच्या आणि वर्तमानाच्या बाबत योग्य निर्णय घेऊ शकता. भविष्यात काही संकट येणार असेल तर ते वेळीच टाळू शकता. भूतकाळातील ज्या चुकांचा अजूनही त्रास होत आहे त्याच्यावर देखील योग्य ते निर्णय घेऊन त्याचा त्रास थांबवू शकता. म्हणूनच मी दोन्ही प्रकारच्या मार्गदर्शनात अगदी सखोल अभ्यास करून त्यामागचे संकेतार्थ आणि भावार्थ वगैरे शोधून सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करतो. आणि ज्यांना हवं आहे त्यांना लाईफ कोचिंग देतो. जेणेकरून जुन्या भावनिक-मानसिक समस्यांचे निराकरण होतं. त्यामुळे जर वाईट स्वप्न पडत असतील. निद्रानाश असेल किंवा इतर अध्यात्मिक शंका असतील आणि त्याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा.