लेख - कॅन्डी क्रश ने पकडलीय सगळ्याची नस
By bhagwatblog on ललित from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
नवीन मोबाइल खरेदी केल्या नंतर बरेच जण अँप आणि विविध गेम्स डॉऊनलोड करतात. मी सुधा केले. त्यापैकी कॅन्डी क्रॅश सागा एक होता. मदतीला धावून येणारा तोच खरा मित्र. त्याप्रमाणे कॅन्डी क्रॅश मध्ये मला जे गूढ शोध विनंती(mystery quest request), जादा प्राण (extra life) पाठवतात तेच खरे माझे मित्र असे वाटते. त्यामुळेच माझा मित्रा वरचा विश्वास कॅन्डी क्रॅश सागा मुळे दृढ झाला आहे. जीवनात ध्येयं गाठण्यासाठी माणूस खुप प्रयत्न करतो पण देवाचे आशीर्वाद असतील तर तुम्ही ध्येयं लवकर मिळवतात. तसेच कॅन्डी क्रॅश सागा मध्ये तुम्ही किती ही प्रयत्न केले तरी कधी-कधी देवाच्या आशीर्वादाची गरज भासतेच.