रिझल्ट........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

मंथनला ती क्वालिटी वॉल्स आईस्क्रीमची ऍड फार आवडायची. पास तो होगा ना वाली!!"फर्स्ट आया तो केसर पिस्ता खायेंगे, सेकंड आया तो ब्लॅक करंट , थर्ड आया तो व्हेनिला, और पास हुआ तो चॉकलेट खायेंगे, असं म्हणत एकेक आईस्क्रीमचे फ्लेवर पोराच्या समोर ठेवत शेवटी पास तो होगा ना?" म्हणणारे त्या मुलाचे वडील त्याला फार क्युट वाटायचे.ती ऍड बघताना त्याला नेहमी वाटायचं, "आपल्यालाही असं कोणी विचारेल का कधी?"आज त्याचाही दहावीचा रिझल्ट लागला होता. पण कोरोनातल्या कॅन्सल झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या रिझल्टची त्याच्या घरी कोणालाच एक्साईटमेंट नव्हती. नेटवर पाहून बाबांना त्याने फोन केला तर बाबांनी फक्त 'ओके गुड' म्हणून फोन ठेऊन दिला होता. पावसाने जोर वाढवल्यामुळे आई तर संपर्क कक्षेच्या बाहेरच जाऊन बसली होती. तसा तिचा स्वतःहून एकदा फोन आला होता, पण त्यावेळी त्यालाच तो कळला नव्हता, ओव्हरलोडमुळे रिझल्टची लिंक क्रॅश होत होती. आणि नंतर मिळाल्यावर आईशी बोलताच आलं नाही. ताईही मैत्रिणीकडे जाऊन बसलेली तीही आली नव्हती.आपला रिझल्ट आणि कोणी घरी देखील नाही याचं मंथनला खूप वाईट वाटत होतं. त्याने दोन चार मित्रांना फोन केले, गप्पा मारल्या, तुला किती मला किती केलं, पण तरी त्याला उदासच वाटत होतं.अगदी चारच वर्षांपूर्वी ताई दहावी झाली तो दिवस त्याच्या डोळ्यासमोर आला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); आठवडाभर आधीपासून सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत होते. इकडचे तिकडचे सगळे नातलग उगाच फोन करून ताईची गमजा करत होते. ताई तर किती गंभीर होऊन बसलेली. मार्क चांगले मिळणार हे माहीत होतं, पण तिला किमान शाळेत तरी बोर्डावर नाव झळकावं अस वाटत होतं. आई बाबा नुसते तिच्या मागेपुढे करत होते. रिझल्टच्या आदल्या दिवशीच गावावरून मावशी आली होती खास तिच्यासाठी. तिचा आवडता मैसूर पाक घेऊन!!आई बाबा चक्क रजा घेऊन घरी बसलले. सगळे ताईभोवती होते, नेटवर रिझल्ट बघताना. ताईबरोबर आईबाबांची पण धडधड वाढलेली. तो रिझल्ट बघितला, अन् शाळेतही तिसरी आल्याचं कळलं तेव्हा कित्ती गलका झाला होता घरात!! लाडू,पेढे काय भरवले जात होते, चहुकडून नुसता कौतुकाचा वर्षाव होत होता तिच्यावर!!पाहुण्यांची रीघ तर आठवडाभर थांबली नव्हती. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); आणि इथे आज मी सुद्धा शाळेच्या टॉप टेन मधेच आहे, तरी माझी कुणी दखलही घेत नाहीये. का तर आमच्या परीक्षाच झाल्या नाहीत!! आम्ही तर केला होता ना वर्षभर अभ्यास? अगदी परिक्षा कॅन्सल व्हायचं कळायच्या दिवसापर्यंत करत होतो. बाहेर वातावरण चांगलं नसताना सुद्धा!! कोरोनाने आमच्या परीक्षेचा खेळखंडोबा केला त्याला आम्ही काय करणार!! आणि आता आमचा ऑनलाइन प्रिलीयमवर, सबमिशन्सवर रिझल्ट काढलाय तर कुणाला पडलच नाही त्याचं काही.दिवसभर मंथन असाच काहीबाही विचार करत बसला होता. ताई आली तिनेही फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. नातेवाईकांचा तर चुकूनही फोन आला नाही. संध्याकाळी बेल वाजली, तस उत्साहाने त्याने दार उघडलं. आई आली, तीही थकलेल्या मूडमध्ये. नंतर बोलू आधी चहा घेते, म्हणत ती फ्रेश होऊन स्वैपाकघरातच शिरली. नंतर बाबाही आले, त्यांंनी तर विषयही काढला नाही. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  मंथनला नुसता राग राग येत होता. मोबाईल घेऊन तोही त्यात डोकं घालून बसला. त्याला मग कोणाशी बोलावंच वाटलं नाही.साधारण अर्धा तासाने पुन्हा बेल वाजली, आई आतून ओरडली, मंथन दार उघड. मंथन अजिबात उठला नाही, मग बाबाच ओरडले, मंथन आईचं ऐकता येत नाही का, जा दार उघड पहिले.मंथन रागानेच उठला. ताड ताड जाऊन त्याने दरवाजा उघडला, समोरचा माणूस म्हणाला, "डिलिव्हरी है......"मंथनने विचारलं, "क्या है?"त्या माणसाने साईडला ठेवलेली सायकल खांद्यावर उचलली आणि म्हणाला, "इसकी. कहाँँ पे रखना है, जल्दी बोलो. अंदर डालू, या बाहर छोड दूँँ?"मंथनच्या डोळ्यासमोर त्याला केव्हापासून हवी असणारी मोठीच्या मोठी गियरवाली सायकल होती!! त्याला आठवलं, बाबांनी त्याला दहावीच्या सुरुवातीला प्रॉमिस केलेलं तुझा रिझल्ट लागला की तुला बक्षीस म्हणून घेणार!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); त्याने ती आत ठेवायला सांगितली. मागे आई, बाबा, ताई सगळे उभेच होते.आईकडे पण त्याच्यासाठी गिफ्ट होतं, आणि ताईकडे सुद्धा!!दिवसभर आतच अडकवून ठेवलेलं डोळ्यातलं पाणी आता मात्र त्याचं न ऐकताच डोळ्यातून घळाघळा वहायला लागलं. सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. "खरंच खूप कौतुक तुझं, कोरोनात स्वतःची मानसिक स्थिती ढासळू न देता, अगदी मान मोडून तू अभ्यास करत होतास, परीक्षा होईल की नाही माहीत नसतानाही!! आमचं लक्ष होतं तुझ्यावर, तेव्हाच ठरवलेलं आम्ही, रिझल्ट काहीही असो, तुला बक्षीस द्यायचंच!!", असं म्हणतच आईने त्याला कुशीत घेतलं.बाबा त्याच्याजवळ आले, त्यांनी आपल्या मागे लपवलेलं आईसक्रिम बाहेर काढलं.आणि म्हणाले, "हे बघ केसर पिस्ता, ब्लॅक करंट, व्हेनिला आणि चॉकलेट, सगळे फ्लेवर घेऊन आलोय तुझ्यासाठी!! किती मन लावून बघायचास ती ऍड. मी खरंतर ठरवलेलं, त्या ऍडवाल्या बाबांंसारखच बोलायचं तुझ्याशी, पण आपल्याला नाही जमत बाबा ऍक्टिंग!! सॉरी हं....."काय हो बाबा, करत मंथन आईकडून बाबांंच्या कुशीत शिरला, ताईनेही लाडाने त्याचा गालगुच्चा घेतला. दिवसभर खट्टू होऊन बसलेल्या मंथनला त्याच्या घरच्यांचं, संध्याकाळचं हे सरप्राईज मात्र खूप खूप भावलं. मनातून ताईच्या रिझल्टचा दिवस पार पुसला गेला, छोटयाश्या सेलिब्रशनची मोठी छाप उमटली त्याच्यावर, जी कायमसाठी त्याच्या हृदयावर कोरली गेली.........!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!