रत्नशास्त्र ऑनलाईन कोर्स : विविध रत्नं, खडे, यांचा कशाप्रकारे उपयोग करून घ्यावा हे शिकून घ्या

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

 रत्नांविषयी गैरसमज दूर करून त्यांचा योग्य उपयोग करून घ्या रत्नांचा उपयोग आणि त्यांचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. आपल्याकडे ऋग्वेदा पासून ते अगदी  महाभारत आणि अग्नी पुराणापर्यंत श्रेठ-अतिश्रेठ दर्जाच्या ग्रंथांमध्ये रत्नांचा महिमा वर्णन केला गेलेला आहे. श्रेष्ठ ज्योतिषी आचार्य वराहमिहीर यांच्या 'बृहत्संहिता' या ग्रंथातदेखील रत्नांविषयी माहिती आहे. तसेच आयुर्वेदातदेखील विविध औषधे निर्माण करण्यासाठी रत्नांचा वापर केलेला आढळतो. आयुर्वेदप्रकाश, रसरत्नसमुच्चय, भावप्रकाश, या ग्रंथात त्याविषयी खूप मोलाची माहिती मिळते.    याशिवाय जगभरातील विविध योद्धे, राजे-महाराजे यांनी सुद्धा वेळोवेळी विविध कार्यसिद्धीसाठी रत्ने धारण केल्याची उदाहरणे आहेत. अंतराळात जे ग्रह आहेत त्यांची ऊर्जा पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव प्राणी-वस्तूंवर पडत असते. सूर्यप्रकाशामुळे सगळे जीव जगतात, चंद्रप्रकाशामुळे समुद्राला भरती-ओहोटी येते, हे आपण शाळेत भूगोलात शिकलो. या दोन ग्रहांप्रमाणेच इतर ग्रहांची ऊर्जा व किरणे यांचाही प्रभाव आपल्यावर पडत असतो विज्ञानांत यावर अनेक प्रकारचं संशोधन चालू आहे. विविध ग्रहांपासून कुठली किरणे व ऊर्जा पृथ्वीवर येते, याविषयी इंटरनेट वर शोधल्यास भरपूर माहिती मिळते. तर हि जी ग्रहांची ऊर्जा आहे जीला आपण 'कॉस्मिक एनर्जी' असं सुद्धा म्हणतो, ती प्रत्येकाच्या वैयक्तिक ऊर्जेप्रमाणे प्रत्येकाकडे वेगवेगळी असते. आपल्या जन्मपत्रिकेतील ग्रहांच्या स्थानामुळे व बळामुळे ती कमी-जास्त होते. त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो, आणि पर्यायाने आपल्या आयुष्यातील इतर गोष्टींवर म्हणजे यश, कारकीर्द, शिक्षण, विवाह, नातेसंबंध, संतती, पैसा, मान-सन्मान, इ. वर होत असतो.   तर हि कमी झालेली ऊर्जा वाढवणे किंवा गरजेपेक्षा जास्त झालेल्या ऊर्जेचे नियमन करणे यासाठी रत्नं वापरतात. हि रत्नं वापरल्यामुळे या ग्रहांच्या ऊर्जेचं योग्य नियमन करता येतं. आणि ते एकदा झालं कि माणूस मनाने आणि शरीराने निरोगी व सशक्त होतो. त्यामुळे आयुष्यात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांविषयी योग्यप्रकारे सारासार विचार करू शकतो, आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकतो. आयुष्यात आपण जसा विचार करतो, तसेच निर्णय घेतो, आणि त्यानुसारच आपलं आयुष्य यशस्वी किंवा अपयशी होत जातं. आणि रत्नं आपल्याला कामासाठी मदत करतात म्हणून त्यांना मी 'दैवी ऊर्जेचे संवाहक' असं म्हणतो.  यामुळे रत्नं आणि खडे यात कुठलीही अंधश्रद्धा नसून ते किती व्यवहारी आणि उपयुक्त आहेत हे सिद्ध होतं.   या कोर्समध्ये पुढील गोष्टी शिकवल्या जातील :-नवग्रहांची रत्नं आणि उपरत्नं  जन्मकुंडलीनुसार नेमक्या कुठल्या ग्रहांचे खडे घालावेत ? कसे घालावेत? कधी घालावेत? पत्रिकेप्रमाणे कि नुसतं जन्मतारखेप्रमाणे? अंगठी कि पेंडंट? कुठल्या हातात- डाव्या कि उजव्या ?पैसे, प्रसिद्धी, यश, मान-सन्मान, कीर्ती, करियर , व्यवसायवाढ, नोकरी, बढती, परदेशगमन, मुलबाळ, घर, गाडी, या करता योग्य खडे कसे निवडावेत ?महादशा-अंतर्दशेनुसार वेळोवेळी खडे बदलावेत कि आयुष्यभर एकाच खडा ठेवावा? कुठले खडे एकमेकांबरोबर घालू नये ?कुठल्या खड्यांपासून सावध रहावे ?वैदिक ज्योतिषाप्रमाणे खडे कसे घालावेत?पाश्चिमात्य ज्योतिषाप्रमाणे  खडे कसे घालावेत?अंकशास्त्राप्रमाणे खडे कसे घालावेत? वास्तुशास्त्राप्रमाणे खडे कसे वापरावेत? रत्नं धारण करण्याचे  पुरुषांचे व स्त्रियांचे नियम रत्नांचे मंत्र व औषधं याविषयी थोडक्यात माहिती रत्नांचे वजन किती असावे?रत्न सिद्ध कसे करावे?रत्नं धारण करण्याचा विधी हा कोर्स इतर कोर्सेसप्रमाणेच ऑनलाईन आहे. नेहमीप्रमाणे ईमेलच्या माध्यमातून एकेक धडा पाठवला जाईल.कालावधी: संपूर्ण कोर्स आठवड्याभरात शिकून होतो. फी: नेहमीची फी रु.६६००/- आहे.  सध्या गणपती निमित्त केवळ रु. ३०००/-  पात्रता:  हा कोर्स करण्यासाठी कुठलीही विशेष पात्रता आवश्यक नाही. मराठी समजू शकत असलेली कुणीही व्यक्ती हा कोर्स करू शकते. ज्योतिषाची विषयाला धरून गरजेपुरती माहिती शिकवली जाईल. हा कोर्स कुणासाठी आहे? ज्यांना रत्नं व खडे यांच्याविषयी आकर्षण आहे, ते घालायला आवडतात.जे ज्योतिषी आहेत आणि त्यांना त्यांच्या क्लायंट्स साठी नवीन कन्सल्टिंग सुरु करायचे आहे.ज्यांना रत्नशास्त्र तज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय करायचा आहेज्यांना ज्ञानाची आवड आहे आणि या विषयाची माहिती जवळ असावी, कधीतरी आयुष्यात उपयोगी पडेल, असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे ज्यांनी या आधी खडे घालून पाहिले, पण त्यांना कधी फरक पडला नाही, अशा अनेकांचे गैरसमज या कोर्समुळे दूर होतील आणि यापुढे धारण केलेल्या रत्नांचा अपेक्षेप्रमाणे फरक पडेल हा कोर्स कुणासाठी नाही?जेमॉलॉजीची अपेक्षा असलेल्या लोकांसाठी हा कोर्स नाही. हा कोर्स रत्नं आणि खड्यांचे अध्यात्मिक व दैवी मार्गदर्शन यासाठी आहे. त्यामुळे या कोर्समध्ये, ज्वेलरी डिझाईनसाठी रत्नांचा उपयोग (different cuts and metals), प्रयोग शाळेत होणारी रत्नपरीक्षा प्रक्रिया (4Cs, refractive index, hardness, etc), इत्यादी ज्योतिषात नसलेल्या गोष्टी शिकवल्या जाणार नाहीत.ईच्छुक असल्यास इथे संपर्क करा 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!