"मी अजून गरोदर (प्रेग्नन्ट) का रहात नाहीये? माझे सगळे प्रयत्न करून झाले आहेत"

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

 तुमच्या लहानपणीच्या आठवणी आणि अनुभव हे तुम्हाला आई होऊ येत नाहीयेत वास्तुशास्त्र आणि गर्भधारणा, मूल होणे,  न होणे याविषयावर आधीच्या पोस्ट्स मध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथे आणि इथे वाचू शकता या लेखात मी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा गरोदरपणाशी असलेल्या संबंधाविषयी माहिती देणार आहे. याचा संबंध थेट तुमच्या लहानपणीच्या आठवणींशी, प्रसंगांशी आणि अनुभवांशी आहे.  या जगात अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना खूप प्रयत्न करून सुद्धा मूलबाळ नाही. या त्यांच्या अवस्थेचे मूळ हे त्यांच्या मानसिक आणि भावनिक त्रासामध्ये आहे. ऑक्सफर्ड सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठातून संशोधन केलेल्या अनेक डॉक्टर आणि वैज्ञानिक यांनी हि गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे कि, ज्या जोडप्यांना मूल होण्यामध्ये अडचणी येत आहेत, त्याच्यामागे जी कारणे आहेत त्यात मानसिक व भावनिक तणाव, लहानपणीच्या भयानक आठवणी व अनुभव, हि देखील महत्त्वाची कारणे आहेत इंटरनेटवर याविषयावरील अनेक संशोधनपर लेख पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. गुगलवर शोधल्यास सापडतील. काही महत्त्वाचे संशोधनात्मक लेख इथे पाहू शकता  : https://www.sciencedaily.com/releases/2015/09/150910091448.htm https://www.webmd.com/baby/features/infertility-stress https://academic.oup.com/humrep/article/22/3/885/608533https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3735147/https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6016043/या सगळ्या खात्रीशीर स्रोतांतून हे सिद्ध झालंय कि तुमची मानसिक अवस्था आणि भावना गरोदर राहण्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. मन जर कमकुवत आणि तणावग्रस्त असेल, लहानपणीच्या आठवणी दुःखद व वाईट असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरोदर राहू देणार नाहीत. आणि हे केवळ बाईसाठी लागू आहे असं नाही. जरी बाई गरोदर राहाणार असेल आणि मानसिक तणाव पुरुषाला असेल, तरी गरोदर राहण्यात अडथळे येतात. वैदिक ज्योतिष या परिस्थितीत कशाप्रकारे सहाय्य करू शकते पाहूया... निर्बली चंद्र = आई बरोबरचे वाद आणि मानसिक विकार एका केसमध्ये, एक जोडपं गरोदर राहण्यासाठी खूप प्रयत्न करत होतं. दोघांच्याही जन्मकुंडल्या तपासल्या तेव्हा लक्षात आलं कि त्या बाईंच्या जन्मकुंडलीत चंद्र, राहू आणि शनी बरोबर बसला आहे आणि त्यामुळे निर्बली आहे. चंद्र + राहू + शनी हि वैदिक ज्योतिषांतल्या महाभयंकर युतींपैकी एक युती आहे.चंद्र हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. तो आपले मन, आई, मानसिक आरोग्य, आणि मनःशांती, यांचा कारक आहे.शनी आणि राहू पापग्रह असून,  शनी हा दुःख, उशीर, बंधन, कष्ट, वगैरे गोष्टींचा कारक आहे. तर राहू हा भ्रमिष्टता, विक्षिप्तपणा, वगैरेंचा कारक आहे.त्यामुळे या परिस्थितीत शनी आणि राहू हे दोघे मिळून चंद्राच्या सगळ्या शुभ गोष्टींचा नाश करून तुमच्या आईसोबतचे तुमचे संबंध बिघडवून, तुम्हाला अनेक प्रकारचे मानसिक विकार, व्याधी देतात. मी त्या बाईंना याविषयी विचारल्यावर त्यांनी तात्काळ होकार दिला. त्यांच्या आईमुळे त्यांना आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्याशी संबंधित गोष्टी मी कुणाबरोबर शेअर करणार नाही, पण त्यांच्या परवानगीने मला फक्त हेच इथे नमूद करायचं आहे, कि ज्याप्रकारे त्यांच्या आईने त्यांना लहानपणी खूप त्रास दिला, त्यामुळे त्यांच्या मनात भीती बसली होती कि आपल्याला मूल झाल्यावर कदाचित आपण सुद्धा त्या मुलाचा असाच छळ करू. जे जे त्यांना भोगावं लागलं ते ते त्यांच्या मुलाला भोगावं लागू नये हि तीव्र  ईच्छा त्यांच्या मनात होती आणि म्हणून त्यांचं अंतर्मन कुठेतरी मूल होऊ देण्याच्या आड येत होतं. मी त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. चंद्र बळ वाढवण्यासाठी काही उपाय दिले आणि मग काही दिवसांतच त्या गरोदर राहिल्या. लहानपणीचे वाईट अनुभव गरोदरपणात अडथळे आणतात हे झालं एक उदाहरण. जगभरात अशी अक्षरशः हजारो-लाखो जोडपी आहेत, जिथे बाई आणि पुरूष दोघांनाही मूल तर हवंय पण मनात खोलवर कुठेतरी भीती आहे, जी गरोदर राहण्याच्या आड येते. इथे लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट अशी कि तुम्हाला अशा सगळ्या प्रकारच्या मानसिक आणि भावनिक तणावावर व विकारांवर मात करून बरे होण्यासाठी चंद्र बळाची गरज आहे. तेव्हा तुमच्या पत्रिकेत चंद्र कसा आहे?  कुठल्या स्थानात आहे?  कुठल्या ग्रहाच्या युतीत आहे?  कुठल्या योगात आहे? त्याच्यावर कुणाची दृष्टी आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल.तसेच गर्भधारणा व इतर नियमांप्रमाणे संततीचा कारक असलेला गुरु, मिलनाचा कारक असलेला शुक्र, यांचा देखील अभ्यास करावा लागेल.  एकदा ते सगळं जमलं कि मग गरोदर राहणं सोपं होईल. तेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या मित्र-नातेवाईक यांपैकी कुणाला गरोदर राहण्यात काही अडथळे येत असतील तर लगेच इथे संपर्क करून याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन घ्या 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!