मासीक राशीभविष्य १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१९ ( मेष ते कन्या राशी साठी )

By gmjyotish on from https://gmjyotish.blogspot.com

नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हेसदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्यसांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहेशुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहेबुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन ५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.थोडक्यात रवि आणि बुध व शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षलआणि नेपच्युन आहे  त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.मेष रास:आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर तुळ राशीत असल्यामुळे "मुग गिळून रहाणे" ह्या शब्द प्रयोगाचा अनुभव महिनाभर येणार आहे. तुमचा स्वभाव उसळून प्रतिक्रिया देण्याचा असला तरी अशी प्रतिक्रिया आपण देऊ शकणार नाही. शत्रु सोबत व्यावहारीक तडजोड आपण करणार आहात. कदाचित याही मुळे शत्रुबाबत सुध्दा आपल्याला प्रतिक्रिया देण्याची संधी ५ डिसेंबर पर्यंत नाही.२४ नोव्हेंबरला होणारी मंगळ हर्षल प्रतियुती तुमच्या आयुष्यात एखादी नको असलेली घटना घडवणार नाही ना याबाबत सावध असावे. किमान या दिवशी वाहनावर असाल तर डोक्याला हेल्मेट किंवा सिट बेल्ट, वेग कमी आणि सावधानता बाळगल्यास अप्रिय घडू नये. २१ नोव्हेंबर २०१९ पासून पुढे महिनाभर आपल्या वैवाहीक जोडीदाराला चांगले दिवस येणार आहेत. जोडीदार खुष तर आपणही खुष असे म्हणण्याचा आपला स्वभाव नाही. आपण आपली स्पेस, आवडी निवडी याबाबत आग्रही असला तरी ही बाब आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात चांगले काही घडत असेल तर याबाबत आनंद व्यक्त करण्याची आहे हे सांगायला नको.वृषभ रास:आपल्या राशीचा मालक शुक्र २१ नोव्हेंबरला धनु राशीत जाणार आहे. धनु रास तुमच्या राशीकडून नेमकी आठवी असते. यामुळे महिनाभर तुम्हाला चेक आणि मेट अशी अवस्था असेल. तशात २४ नोव्हेंबरला  शुक्र आणि गुरुची युती आठव्या स्थानी झाल्यावर इतर राशींना जी चांगली फ़ळे मिलणार आहेत अशी तुम्हाला मिळणार नाहीत. आपण डॉक्टर असाल तर मात्र एखादया निष्णांत डॉक्टर कडून आपल्याला उत्तम टीप्स मिळतील.शुक्र आणि शनिची युती ११ डिसेंबरला होत आहे. अनेकांना हा दिवस स्मरणात राहील असा असेल. आपण आणि आपले वरिष्ठ जर खोलात जाऊन काही शोध घेत असाल तर नक्कीच आपल्या कलेची चुणूक त्यांना दिसेल. महिन्याच्या शेवटी होणारी प्लुटो आणि शुक्र युती अनेक तरुणांचा ब्रेक अप करणारी असेल.मिथुन रास :आपल्या राशीचा मालक बुध तुळ राशीत महिन्याच्या सुरवातीपासून वक्री असणार आहे. २१ नोव्हेंबरला तो एकदा मार्गी झाल्यावर तुम्हाला तुमचा सुर गवसणार आहे. शाब्दीक फ़टकेबाजीला जणू कित्येक दिवस बांधून ठेवले होते त्याचे पारणे अनेकांशी किती बोलू या पध्दतीने तुम्ही फ़ेडणार आहात. नेहमीच्या हास्य विनोदाने पुन्हा वातावरण हलके फ़ुलके करुन टाकणार आहात.५ डिसेंबरला बुध वृश्चिक राशित जाईपर्यंत महत्वाची कामे मार्गी लावा. अनेक तरुणांना २४ नोव्हेंबरला प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस आहे असे वाटते. इथे जोडीदारच तुम्हाला प्रपोज करणार असल्यामुळे प्रपोज करण्यासाठी वातावरण निर्माण करा. जोडीदाराला आपल्याबद्दल विश्वास निर्माण होईल असे वातावरण ठेवा म्हणजे महिन्याच्या शेवटी कटू प्रसंग येणार नाहीत.कर्क रास :या महिन्यातसंततीच्या डिमांड वाढणार आहेत. दिवाळीहोऊन गेली तरी हेपाहीजे ते पाहिजे असेचित्र या महिन्यात दिसेल. बालहट्ट पुरवला पाहिजे म्हणूनतरतुद करा. या महिन्यात२१ तारखेनंतर आपल्यालास्वत: चे आजारपण यामुळेकिंवा मित्राने केलेल्याफ़सवणुकी मुळे खर्च वाढूशकेल. हे कमी कीकाय २१ तारखेनंतर मातेशीवाद विवाद वाढू शकतात. आपणखरेदी केलेल्या घरगुतीवस्तु खराब निघाल्याने आपल्यालाकस्टमर केअर बरोबर वादविवाद करुन वस्तू बदलूनआणण्यासाठी परिश्रम पडतील.विद्यार्थीवर्गाला २१ नोव्हेंबर नंतरअभ्यास कसा करावा याचेतंत्र किंवा एखाद्या विषयाचेमर्म समजेल जेणे करुनडिसेंबर मधे एखादी परिक्षाअसेल त्यात यश मिळेल. एकंदरीतविद्यार्थी वर्गाला हा महिनाअभ्यास किंवा परिक्षामधे यशया दृष्टीने चांगलाजाईल.सिंह रास :आपल्या राशीचामालक रवि महिनाभर चवथ्यास्थानी असणार आहे. ही अवस्थाजंगलच्या राजाला पिंजर्यात बांधुनठेवल्याची आहे. पण यानिमीत्ताने घरच्या मंडळींना वेळदेता येईल, त्यांच्या समवेतसुख वार्ता आणि उत्कृष्टघरच्या जेवणाचा तसेच वामकुक्षीअर्थात पॉवर नॅप चेयोग या महिन्यात वारंवारयेतील.यामहिन्यात नोकरी/व्यवसायात आपल्याहाताखालच्या लोकांना नविन कामाचीपध्दत असो की अन्यकाही, फ़ॉर्मल ट्रेनिंग च्यामाध्यमातून शिकवण्याची संधीआपल्याला मिळणार आहे. हीच एकसंधी असते की आपणलोकांना आपल्या किंवा व्यवसायाच्यादृष्टीने अपेक्षा समजाऊन सांगण्याची. हे काम आपण उत्तमकरुन हाताखालच्या लोकांनाआपलेसे कराल.आपण करत असलेले प्रेझेंटेशनमुळे काही विरोधाभास निर्माणहोत नाही ना याचीमात्र काळजी घ्या. अनेकदा सरकारीफ़तवे अश्या controversy मुळे अर्थहीन होतात.कन्या रास:आपल्या राशीचा मालक बुध २१ नोव्हेंबर पर्यंत तुळ राशीत वक्री असणार आहे. त्यामुळे २१ तारखेपर्यंत आपले आराखडे, पैसे नियोजनातली आकडेमोड मनाप्रमाणे होणार नाही. काहीतरी चुकत आहे असे वाटत राहील. २१ तारखेनंतर मात्र घोळ समजेल आणि हायसे वाटेल. बॅंक किंवा फ़ायनान्स क्षेत्रातील लोकांना सुध्दा २१ तारखेनंतर थोडी उसंत मिळेल.कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात लिखाणाची आवड असेल तर भरपुर लिखाण एकटाकी हातावेगळे करता येईल. आजकाल सोशल मिडीयावर नियम फ़ार कडक होत असल्यामुळे धाडसाने काही लिहून अंगाशी येणार नाही ना येवढे पहा.आपल्याला या महिन्यात एखाद्या आर्थिक विषयावर किंवा धार्मिक विषयावरील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळण्याचा योग बाहेर कुठेही न जाता एक तर दुरदर्शन वर मिळेल किंवा अशी व्यक्ती चालून घरी येईल. दिवाळी संपली असली तरी ज्ञान हीच दिवाळी असा अनुभव येईल.१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( तुळ ते मीन राशी साठी )
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!