भेंडीची आमटी

By Purva on from marathifoodfunda.blogspot.com

तळकोकणात व गोवा-कारवार कडे या पद्धतीची भाज्यांची आमटी केली जाते. हि आमटी वाफाळत्या भातासह रवा लावून तळलेल्या सुरण किंवा नीर फणसाच्या काप्यासह फारच अप्रतिम लागते. कधीतरी आपल्या नेहमीच्या डाळीच्या आमटीला सुट्टी देऊन करायला काहीच हरकत नाही. साहित्य:भेंडी- २५० ग्रॅममीठ- चवीनुसार कोथिंबीर, चिरून- १ टेबलस्पूनकांदा- १ लहान ओले खोबरे, खोवून- १/२ कप लसूण- ४ पाकळ्यालाल सुक्या बेडगी मिरच्या- ४ ते ५ (किंवा मिरची पूड- १ टीस्पून ) धणे- १ टीस्पूनजीरे-  १ टीस्पूनबोराएवढी चिंच (किंवा १ टेबलस्पून चिंचेचा कोळ)मेथीदाणे- १/४  टीस्पून मोहोरी- १ टीस्पून हिंग- १/४ टीस्पून हळद- १/२  टीस्पून कढीपत्ता- ५ पाने तेल- ३ टेबलस्पून (कृती मध्ये याविषयी सविस्तर वाचावे.) कृती:चिरलेला कांदा, ओले खोबरे, लसूण, सुक्या मिरच्या, धणे, जिरे आणि चिंच  असे सर्व एकत्र साधारण १/४ कप गरम पाण्यात भिजवावेत. १५-२० मिनिटानी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.भेंडी धुवून पुसून घ्यावी. दोन्ही कडेची देठं कापून उभी चिरावीत. जर भेंडी आकाराला लहान असेल तर अख्खीच वापरावी. नाहीतर दोन तुकडे करावे. कढईत ३ टेबलस्पूनतेल गरम करावे. त्यात चिरलेली भेंडी मिडीयम हाय फ्लेमवर ब्राउन होईस्तोवर तळावी. याला साधारण ७-८ मिनिटे लागतात. कमी तेलात तळत असल्याने भेंडी कालथ्याने सतत परतत राहा. भेंडी तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. (किंवा घाई असेल तर भेंडी जास्त तेलात सरळ डीप फ्राय करून घ्या. पण मग फोडणीसाठी फक्त १ टेबल्स्पून तेल वापरा.) त्याच उरलेल्या तेलात मोहोरी, मेथीदाणे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करा त्यात वाटलेला मसाला घाला आणि मोठ्या आचेवर परता. मिश्रण बऱ्यापैकी कोरडे झाले आणि थोडे तेल सुटायला लागले कि त्यात पाणी घाला. पाणी घालून आवश्यक तेवढे पातळ करा. आमटीत मीठ व  कोथिंबीर घाला.आमटीला उकळी फुटली कि तळलेल्या भेंडी घालाव्यात आणि २-३ मिनिटे उकळू द्यावे. गॅस बंद करून आमटीवर झाकण ठेवा. ५ मिनिटे आमटी मुरू द्या आणि लगेच वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!