भिंतींपलीकडची शाळा
By sameer on ग्रेट मराठी from sameerzantye.blogspot.in
ही ‘शाळा’ आहे, पण इथे वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, फळ्यावर काहीतरी लिहून माथी मारण्याचा प्रयत्न नाही. परीक्षा घेणे, उत्तीर्ण करणे, पुढच्या वर्गात प्रोमोट करणे असलाही प्रकार नाही. तज्ज्ञांची पुस्तके प्रमाण मानून स्वत:ची बुद्धी घडविण्याचे कामही येथे होत नाही... पण तरीही ही एक शाळा आहे.