भाजणी (थालीपीठाची)
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
भाजणी हा मराठी खाद्यसंस्कृतीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष गुणसंपन्न मूळ पदार्थ आहे. भाजणी घरात असेल तर घाईच्या किंवा अडचणीच्या वेळी केव्हाही पटकन खाण्याची सोय करता येते. भाजणीचा उपयोग करून अनेक वैशिष्ट्यपूर्ण, चविष्ट व खमंग पदार्थ करता येतात. आपण नंतर ते पाहणारच आहोत.पौष्टीकपणा हा भाजणीचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. धान्ये व कडधान्ये भाजून घेतल्याने भाजणी पचनास हलकी असते. जितकी जास्त प्रकारची धान्ये व कडधान्ये आपण वापरू त्या प्रमाणत एकेका धान्य-कडधान्यातील घटक पदार्थांच्या कमतरतेची भरपाई होते.